Spread the love

Live marathiprasar संगीता पवार प्रतिनिधी [ tata capital pankh scholarship program ] : टाटा कॅपिटल लिमिटेड आणि टाटा समूह मार्फत विविध प्रकारच्या शिष्यवृत्ती देण्यात येतात , यामध्ये 11 वी , 12 वी तसेच पदविका मध्ये प्रवेश विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासक्रमाच्या शुल्काच्या 80% पर्यंत अथवा 10 ते 12 हजार रुपयांची एक वेळची शिष्यवृत्ती प्रदान केली जाते . ज्यामुळे गरीब विद्यार्थ्यांना आर्थिक लाभ मिळतो . सदर शिष्यवृत्ती योजनेबाबत सविस्तर माहिती खालील प्रमाणे पाहूयात ..

पात्रता : सदर योजनेच्या माध्यमातून लाभ घेण्याकरिता विद्यार्थी हा इयत्ता अकरावी आणि बारावी मध्ये अथवा पदवीसाठी /  भारतातील मान्यताप्राप्त संस्थांमध्ये डिप्लोमा / पॉलीटेक्निक अभ्यासक्रमास प्रवेश घेतले असावेत .  तर त्यास अगोदरच्या इयत्तेमध्ये किमान 60 टक्के गुण प्राप्त झाले असावेत , तसेच त्याच्या कुटुंबीयांची वार्षिक उत्पन्न 250,000 /- हजार पेक्षा कमी असावेत .

शिष्यवृत्तीची आर्थिक स्वरूप : सदर शिष्यवृत्ती योजने अंतर्गत पदवी , डिप्लोमा / पॉलिटेक्निक अभ्यासक्रमाकरिता प्रवेश असणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासक्रमाच्या 80% पर्यंत फीस अथवा बारा हजार रुपये ,  एक वेळची शिष्यवृत्ती दिली जाते .तर अकरावी व बारावी मध्ये शिक्षण घेत असणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासक्रमाची 80 टक्के पर्यंत कोर्स फी अथवा 10 हजार रुपये रक्कम शिष्यवृत्ती म्हणून दिली जाते .

अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे : सदर शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत लाभ घेण्याकरिता विद्यार्थ्यांकडे आधार कार्ड , पासपोर्ट साईज फोटो,  उत्पन्नाचा दाखला , शाळा / महाविद्यालय प्रवेश पुरावा , चालू शैक्षणिक वर्षाच्या फिसची पावती इ.

अर्ज कसा करावा : सदर शिष्यवृत्ती योजने अंतर्गत लाभ घेण्याकरिता ऑनलाईन पद्धतीने , http://buddy4study.com या संकेतस्थळावर दिनांक 15 ऑक्टोबर 2024 पर्यंत सादर करायची आहेत .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *