लाईव्ह मराठी पेपर , बालाजी पवार : महाराष्ट्र राज्य शासकीय अधिकारी / कर्मचाऱ्यांना देय असणाऱ्या स्वग्राम व महाराष्ट्र दर्शन प्रवास सवलतींच्या तरतुदींमध्ये वित्त विभागाच्या दिनांक 10 जुन 2015 रोजीच्या शासन निर्णयांनुसार महत्वपुर्ण काही नविन सुधारणा करण्यात आलेले आहेत .
महाराष्ट्र राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांना आपल्या स्वग्रामी जाण्यासाठी दोन वर्षांतुन एक वेळा स्वग्राम प्रवास सवलत देण्यात येते तर चार वर्षांच्या एका गटवर्षांत एकदा महाराष्ट्र दर्शन प्रवास सवलत अनुज्ञेय आहे .सदर प्रवासल सवलती घेत असताना वित्त विभागाच्या सुधारित तरतुदीनुसार दिनांक 10 .06.2015 रोजीच्या शासन निर्णयांनुसार काही अटी व शर्ती विहीत करण्यात आल्या आहेत .
स्वग्राम प्रवास सवलत : स्वग्रमा प्रवास सवलत लाभ घेण्यासाठी अधिकारी / कर्मचाऱ्यांने आपल्या नियुक्तीनंतर सहा महिन्यांच्या आत सेवापुस्तीकांमध्ये आपले स्वग्राम घोषित करणे आवश्यक असते , स्वग्राम हा अधिकारी / कर्मचाऱ्यांना सेवाकाळांमध्ये फक्त एकदाच बदलता येणार आहे .सदर प्रवास सवलतीचा लाभ घेण्यासाठी राज्यांमध्ये किंवा राज्याबाहेर प्रवासाच्या अंतराची कोणतीही मर्यादा असणार नाही .भारताबाहेर स्वग्राम असल्यास देखिल राज्य अधिकारी कर्मचाऱ्यांना स्वग्राम प्रवास सवलत अनुज्ञेय करण्यात येते .
महाराष्ट्र दर्शन : राज्यातील अधिकारी / कर्मचाऱ्यांना सेवाकाळात चार वर्षाच्या एका गट वर्षांसाठी एकदा महाराष्ट्र दर्शन प्रवास सवलतीचा लाभ घेता येतो , यांमध्ये आपल्या कुटुंबाचा देखिल प्रवास खर्च प्रतिपुर्ती करण्यात येते . परंतु कुटुंबामध्ये केवळ पती / पत्नी व दोन अपत्ये यांनाच सवलत दिली जाईल . तर दिनांक 30 एप्रिल 2001 रोजी दोनपेक्षा अधिक मुले असतील व त्यांची संख्या ही नंतर वाढली नसल्यास अशा कुटुंबास देखिल सदर लाभ अनुज्ञेय करण्यात येते .तसेच आई – वडील व भाऊ बहीण यांची नावे रेशनकार्ड कर्मचाऱ्यांच्या पत्तयावरील असल्यास अशावेळी देखिल प्रवास सवलत अनुज्ञेय करण्यात येते .
सदर प्रवास सवलतीबाबतचा वित्त विभागांकडून निर्गमित करण्यात आलेला सुधारित GR डाऊनलोड करण्यासाठी खालील नमुद लिंकवर क्लिक करावेत ..
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !