Live Marathipepar प्रणिता पवार प्रतिनिधी [ Pension And After Retirement Age Benefit Gr ] : मा. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे वेतन आयोगाने केलेल्या शिफारशीनुसार , सुधारित सेवानिवृत्तीवेतन व तद्नुषंगिक बाबी लागू करणेबाबत , राज्य शासनांच्या उद्योग , उर्जा व कामगार विभागांकडून दिनांक 30 नोव्हेंबर 2023 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
मा.सर्वोच्च न्यायालयातील रिट याचिका 643/2015 च्या अनुषंगाने दुय्यम न्यायालयातील न्यायिक अधिकाऱ्यांच्या वेतनश्रेणीत सुधारणा करण्यासाठी मा. सर्वोच्च न्यायालयाने मा.न्या.पी.व्ही रेड्डी निवृत्त न्यायाधिश सर्वोच्च न्यायालय यांच्या अध्यक्षतेखाली दुसऱ्या राष्ट्रीय न्यायिक वेतन आयोगाची स्थापना केली होती , या आयोगाने आपला अहवाल जानेवारी 2020 मध्ये मा.सर्वोच्च न्यायालयास सादर केला आहे . त्यानंतर मा. सर्वोच्च न्यायालयाचे रिट याचिका क्र.643/2015 या प्रकरणात दिनांक 19.05.2023 रोजी दुसरा राष्ट्रीय न्यायिक वेतन आयोगाने केलेल्या शिफारशीनुसार , दुय्यम न्यायालयातील सेवानिवृत्त न्यायिक अधिकाऱ्यांना सुधारित निवृत्तीवेतन व तद्अनुषंगीक बाबी लागू करण्याचे आदेश दिलेले आहेत .
सदर शासन निर्णयानुसार दुसऱ्या राष्ट्रीय न्यायिक वेतन आयोगाने सेवानिवृत्त न्यायिक अधिकाऱ्यांना सुधारित निवृत्तीवेतनाबाबत व इतर लाभांबाबत केलेल्या शिफारशी मा. सर्वोच्च न्यायालयाने दिनांक 19 मे 2023 रोजी दिलेल्या आदेशानुसार , स्विकारल्या असून या शिफारशी विधी व न्याय विभागाच्या दि.18.08.2023 रोजी रोजीच्या शासन निर्णयाने राज्यातील दुय्यम न्यायालयातील सेवानिवृत्त न्यायिक अधिकाऱ्यांना लागु करण्यात आल्या आहेत .
सदर शिफारशी आता राज्यातील औद्योगिक व कामगार न्यायालय व श्रमिक भरपाई आयुक्त कार्यालयातील सेवानिवृत्त न्यायिक अधिकाऱ्यांना दिनांक 01 जानेवारी 2016 पासून लागु करण्यात येत आहेत . तसेच मा. सर्वोच्च न्यायालयाचे रिट याचिका क्र.643 /2015 मध्ये दिनांक 23.11.2023 रोजी दिलेल्या निर्देशाचे अनुषंगाने याबाबतची थकबाकी दिनांक 06.12.2023 पुर्वी अदा करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .
त्याचबरोबर या संदर्भातील सेवानिवृत्ती वेतन व अनुषंगिक लाभांची परिगणना विधी व न्याय विभागाच्या शासन निर्णय क्र.एचसीटी 1222 /1065 प्र.क्र 163 दिनांक 18.08.2023 मध्ये नमुद करण्यात आल्यानुसार करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .या संदर्भात उद्योग , उर्जा व कामगार विभागांकडून दिनांक 30.11.2023 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे पाहु शकता ..
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.