Spread the love

लाईव्ह मराठी पेपर , संगिता पवार : महाराष्ट्र राज्यातील कर्मचाऱ्यांना सुधारित वेतन संरचना मंजुर करणेबाबत राज्य शासनांच्या नियोजन विभागांकडून दिनांक 23 ऑगस्ट 2023 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .

राज्य शासनांच्या अर्थ व सांख्यिकी संचालनालयातर्गत उपसंचालक संवर्गास सुधारित वेतन संरचना मंजुर करण्याबाबत राज्य वेतन सुधारणा समिती 2017 च्या अहवाल खंड 2 मधील वेतनश्रेण्यांविषयक व अनुषंगिक शिफारशी वित्त विभागाच्या दिनांक 13.02.2023 च्या शासन निर्णयान्वये शासनाने स्विकृत केल्या आहेत .

राज्य वेतन सुधारणा समिती 2017 च्या अहवाल खंड 02 मधील वेतनश्रेण्यांविषयक व अनुषंगिक शिफारशी स्वीकृत करण्याबाबत वित्त विभागाने निर्गमित केलेल्य शासन निर्णय क्र.वेपुर 1121/प्र.क्र4/ सेवा 9 दिनांक 13/02/2023 नुसार सुधारित वेतनस्तर मंजुर केलेला उपसंचालक ( निवडश्रेणी ) याऐवजी उपसंचालक अशी सुधारणा करण्याबाबत अधिसुचना निर्गमित करताना वित्त विभागामार्फत कार्यवाही करण्यात येणार आहे .

सद्यस्थितीत उपसंचालक या पदास एस 20 रुपये 56100-177500 ऐवजी एस – 23 रुपये 67700-208700 ही सुधारित वेतन संरचना मंजुर करण्यात येत आहे . सदरचा शासन निर्णय हा वित्‍त विभागाच्या अनौपचारिक दि.04.08.2023 नुसार वित्त विभागाच्या सहमतीने निर्गमित करण्यात येत आहेत .

संवर्गाचे नावउपसंचालक ( निवडश्रेणी )
सातव्या वेतन आयोगानुसार मंजुर सुधारित वेतनस्तरएस 20      56100-177500
समितीने शिफारस केलेला सातव्या वेतन आयोगातील सुधारित वेतनस्तरएस 23      67700-208700

सदर सुधारित वेतन संरचना लागु करणेबाबत राज्य शासनांच्या नियोजन विभागांकडून दिनांक 23 ऑगस्ट 23.08.2023 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे पाहु शकता ..

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच इतर पात्र कर्मचारी त्याचबरोबर सेवानिवृत्त पेन्शनधारक  / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *