Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Sudharit National Pension System ] : राज्यातील सन 2005 नंतर शासन सेवेत रुजु होणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांना सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना लागू करण्याची मोठी घोषणा राज्य सरकारने केली आहे . ज्यांमध्ये जुनी पेन्शन प्रमाणे 90 टक्के लाभ लागु करण्यात येणार आहेत .
ज्यांमध्ये जुनी पेन्शन प्रमाणे शेवटच्या वेतनाच्या 50 टक्के रक्कम पेन्शन म्हणून निश्चित करण्यात येईल , तसेच सेवानिवृत्ती उपदान , पेन्शन विक्री , रजा रोखिकरण लाभ असे लाभ लागु करण्यात येणार आहेत . पंरतु याबाबत अद्याप कोणताही अधिकृत शासन निर्णय / शासन अधिसूचना निर्गमित करण्यात आलेली नाही . यामुळेच राज्यातील कर्मचाऱ्यांमध्ये पेन्शन योजनाबाबत अद्याप संभ्रम कायम आहे .
अधिकृत्त निर्णय कधी निर्गमित होणार : सुधारित पेन्शन लागु करणेबाबत , राज्य सरकारने लोकसभा निवडणूकीपुर्वी विधानसभेत घोषणा केली आहे .परंतु अधिकृत्त निर्णय अद्याप प्रलंबित ठेवण्यात आलेला आहे . कारण येत्या नोव्हेंबर महिन्यात राज्याच्या विधानसभेच्या निवडणूका होणार आहेत , यामुळे निवडणूकीमध्ये या निर्णयाचा फायदा व्हावा याकरीता , याबाबत अधिकृत्त निर्णय विधानसभेच्या निवडणूकीच्या तोंडावर घेण्यात येईल .ज्यामुळे निवडणूकींमध्ये विद्यमान सरकारला सदर निर्णयाचा फायदा होईल .
सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजनामध्ये असू शकतील काही महत्वपुर्ण अटी / शर्ती : राज्यातील सर्वांना सरसकट जुनी पेन्शन प्रमाणेच सर्वच लाभ लागु करण्यात येणार नाहीत , जसे कि शेवटच्या वेतनाच्या 50 टक्के रक्कम निवृत्तीवेतन फक्त 30 वर्षे सेवा झालेल्यांना निश्चित होईल . अशा काही महत्वपुर्ण अटी / शर्ती असू शकतील .
राज्याच्या विधानसभा निवडणूकीची पार्श्वभूमी पाहता , राज्यातील कर्मचाऱ्यांना ऑक्टोंबर महिन्यांपर्यंत सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना लागु करणेबाबत , अधिकृत्त निर्णय / अधिसूचना निर्गमित करण्यात येईल ..
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.