Live Marathipepar , संगिता पवार प्रतिनिधी [ mahagai Bhatta DA Vadh Nirnay ] : केंद्र शासनाच्या वित्त मंत्रालय खर्च विभागाकडील ज्ञापन क्रमांक 01.01.2023 E.II(B) दिनांक 20.10.2023 नुसार केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिनांक 01 जुलै 2023 पासून 42 टक्के वरुन 46 टक्के प्रमाणे महागाई भत्ता वाढ मंजुर केलेली आहे . महापालिका कर्मचाऱ्यांना केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणे महागाई भत्ता लागु करण्याचे धोरण मा.महापालिका सभा ठराव क्र.5024 दिनांक 10.10.2023 नुसार ठरलेले आहे .
यानुसार पिंपरी चिंचवड महानगरपालिका कर्मचाऱ्यांना दिनांक 01 जुलै 2023 पासून महागाई भत्ता वाढ मंजुर करणे आवश्यक असल्याचे नमुद करण्यात आलेले आहे . मा. आयुक्त यांनी दि.08.10.2018 च्या मान्य प्रस्तावानुसार , म.न.पा नियमित कर्मचाऱ्यांबरोबर सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सुद्धा महागाई भत्ता वाढ मंजुर करणे बाबत मान्यता दिली आहे .
सदरच्या संदर्भाच्या अनुषंगाने पिंपरी चिंचवड पालिका कर्मचाऱ्यांना तसेच सेवानिवृत्त कर्मचारी व कुटुंब निवृत्तीवेतन धारक यांना देखिल केंद्र शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणेच दिनांक 01 जुलै 2023 पासून सातवा वेतन आयोगानुसार अनुज्ञेय महागाई भत्ता 42 टक्के ऐवजी 46 टक्के लागू करण्यात येत आहेत .
माहे ऑक्टोंबर 2023 चे वेतन व पेन्शन बिल 46 टक्के महागाई भत्ता विचारात घेवून काढण्यात यावेत असे निर्देश देण्यात आलेले आहेत . तसेच माहे जुलै 2023 ते माहे सप्टेंबर 2023 अखेरची महागाई भत्याची थकबाकी माहे ऑक्टोंबर 2023 चे वेतन देयके / पेन्शन देयका बरोबर काढण्यात यावेत असे निर्देश देण्यात आलेले आहेत .
या संदर्भात पिंपरी चिंचवड पालिका प्रशासंनाकडून निर्गमित करण्यात आलेला सविस्तर निर्णय पुढीलप्रमाणे पाहु शकता ..
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.