Spread the love

Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ state vetantruti nivaran samiti work in progress ] : राज्‍य शासनांच्या वित्त विभागांकडून दिनांक 14जुन 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेल्या , परिपत्रकानुसार वेळापत्रकानिहाय राज्यातील कर्मचाऱ्यांच्या वेतनत्रुटींचे प्रस्ताव वेतनत्रुटी निवारण समितीमार्फत घेण्यात येत आहेत .

आतापर्यंत 08 विभागातील कर्मचाऱ्यांच्या वेतनत्रुटीचे प्रस्ताव संबंधित विभाग तसेच कर्मचारी संघटना मार्फत वेतनत्रुटी निवारण समिती समोर सादर करण्यात आलेले आहेत .यांमध्ये जलसंपदा विभाग , वित्त विभाग , सामान्य प्रशासन विभाग , इतर मागास वर्ग व बहुजन कल्याण विभाग , विधी व न्याय विभाग , आदिवासी विकास विभाग , सार्वजनिक बांधकाम विभाग , मराठी भाषा विभाग या विभागातील कर्मचाऱ्यांच्या वेतनत्रुटीचे सादरीकरण वेतनत्रुटी समितीसमोर झालेले आहेत .

आणखीण 17 विभागातील वेतनत्रुटींचे निवारण होणे , बाकी आहेत . सदर प्रक्रिया दिनांक 08 ऑगस्ट 2024 पर्यंत चालणार असून ,त्यानंतर वेतनत्रुटी समितीमार्फत सदर वेतनत्रुटी अहवाल राज्य शासनांकडून सादर करण्यात येणार आहेत . म्हणजेच याबाबत माहे ऑगस्ट महिन्यांच्या अखेरपर्यंत अधिकृत्त शासन अधिसुचना / शासन निर्णय निर्गमित केला जावू शकतो .

01 जानेवारी 2024 पासुन होणार वेतनांमध्ये सुधारणा : ज्या पदांच्या वेतनांमध्ये त्रुटी असतील , अशा पदांना सातवा वेतन आयोगानुसार दिनांक 01 जानेवारी 2024 पासुन करण्यात येणार आहेत , यामुळे सदर कर्मचाऱ्यांना वेतनाचा फरक देखिल मिळणार आहेत .

कोर्टातील प्रलंबित प्रकरणांची देखिल दखल : वेतनत्रुटी अनेक प्रकरणे दाखल आहेत , या अनुषंगाने सदर वेतनत्रुटी समितीचे गठण करण्यात आलेले आहेत . यामुळे सदर कोर्टातील प्रलंबित प्रकरणांची विशेष दखल सदर समितीमार्फत घेतली जाणार असून , सदर कर्मचाऱ्यांना सुधारित वेतनश्रेणी लागू करण्यात येणार आहेत .

यामुळे ज्या विभागातील कर्मचाऱ्यांचे वेतनत्रुटीचे , वेतनत्रुटी समितीकडे सादर करणे बाकी आहेत , अशा विभागांना / सदर विभागातील कर्मचारी संघटनांस वेतनत्रुटी प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *