Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State School Leave Shasan Paripatrak ] : राज्यातील प्राथमिक , माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांची सन 2024 ची उन्हाळी सुट्टी व शैक्षणिक वर्ष 2024-25 सुरु करणेबाबत , शिक्षण संचालनालय ( माध्यमिक व उच्च माध्यमिक , महाराष्ट्र राज्य पुणे ) यांच्या कार्यालयामार्फत दिनांक 18 एप्रिल 2024 रोजी महत्वपुर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे .
राज्य शासनांच्या शालेय शिक्षण विभागाच्या दिनांक 20.04.2023 रोजीच्या परिपत्रकानुसार , शासनाने संपुर्ण राज्यातील राज्य मंडळाच्या प्राथमिक , माध्यमिक व माध्यमिक शाळांच्या उन्हाळी सुट्टीच्या कालावधीमध्ये , एकवाक्यता व सुसंगती आणण्यासाठी सूचना निर्गमित केलेल्या आहेत . त्या अनुषंगाने राज्यातील राज्य मंडळाच्या प्राथमिक , माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांची सन 2024 ची उन्हाळी सुट्टी व शैक्षणिक वर्ष 2024-25 सुरु करणेबाबत पुढीलप्रमाणे सुचना देण्यात आलेले आहेत .
यांमध्ये नमुद करण्यात आले आहे कि , राज्यातील राज्य मंडळाच्या सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना गुरुवार दिनांक 02 मे 2024 पासून सुट्टी जाहीर करण्यात येत आहेत . तसेच राज्यातील इतर मंडळाच्या शाळा वेळापत्रकानुसार सुरु असल्यास किंवा अशा शाळांमध्ये महत्वाचे शैक्षणिक उपक्रम राबविण्यात येत असल्यास , विद्यार्थ्यांना सूट्टी जाहीर करणेबाबत शाळा प्रशासनाने त्यांच्या स्तरावर उचित निर्णय घेण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .
तसेच जून महिन्यातील विदर्भाचे तापमान विचारात घेता विदर्भ वगळता इतर सर्व विभागातील सन 2024-25 करीता शाळा ह्या 15 जुन रोजी तर विदर्भ करिता उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर तेथील राज्य मंडळाच्या शाळा शनिवार दिनांक 30 जून रोजी रविवार येत असल्याने सोमवार दिनांक 01 जुलै 2024 पासून सुरु करण्यात यावेत असे सूचित करण्यात आलेले आहेत . सदरच्या सुचना ह्या सर्व मान्यता प्राप्त राज्य मंडळाच्या प्राथमिक , माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना लागु असणार आहेत .
हे पण वाचा : राज्यात शैक्षणिक क्षेत्रात विविध शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी पदांसाठी महाभरती 2024
या संदर्भात राज्य शासनांच्या शिक्षण संचालनालय मार्फत दिनांक 18 एप्रिल 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर परिपत्रक पुढीलप्रमाणे पाहु शकता ..
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.