Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State govt. Give Benefit to Pensioners as Central govt. ] : राज्यातील पेन्शनधारकांना केंद्र सरकारच्या धर्तीवर वाढीव पेन्शनचा लाभ देणेबाबत , राज्य शासनांकडून अधिवेशनात मोठा निर्णय घेतला आहे . यामुळे राज्यातील पेन्शनधारकांना मोठा आर्थिक दिलासा प्राप्त होणार आहे .

महाराष्ट्र राज्य शासन सेवेतुन सेवानिवृत्त झालेल्या पेन्शनधारकांना वाढीव वयोमानानुसार वाढीव पेन्शन देणेबाबत राज्य सरकारकडून मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे . सदरचा निर्णय हा केंद्र सरकारच्या धर्तीवर घेण्यात आलेला आहे . यांमध्ये पेन्शनधारकांच्या 80 वर्षानंतर पेन्शनमध्ये पेन्शन वाढ करण्यात येते , सदरची वाढ ही वयोमानाच्या वाढीनुसार , पेन्शनमध्ये देखिल वाढ करण्यात येते . सदरची वाढ ही केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्यातील पेन्शनधारकांना लागु करण्याच्या प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळाकडून मान्यता देण्यात आलेली आहे .

पेन्शनधारकांच्या वयोमानानुसार मिळणार वाढीव मोबदला : यांमध्ये पेन्शनधारकांच्या 80 ते 85 वर्षे आहे अशांना केंद्राप्रमाणे 20 टक्के वाढीव मोबदला मिळणार आहे . तर वयाच्या 85 – 90 वर्षे असणाऱ्या निवृत्तीवेतनधारकांना वाढीव 30 टक्के तर वयाच्या 90-95 वर्षे असणाऱ्या पेन्शनधारकांना 40 टक्के वाढीव मोबदला देण्यात येणार आहे .95-100 वर्षे वय असणाऱ्या निवृत्तीवेतनधारकांना 50 टक्के वाढवी पेन्शन लाभ मिळणार आहे . तर ज्यांचे वय 100 वर्षे व त्यापुढील निवृत्ती वेतन धारकांना 100 टक्के वाढीव मोबदला देण्यात येणार आहे .

अ.क्रपेन्शनधारकांचे वयोमानवाढीव मोबदला
01.80-85 वर्षे20 टक्के
02.85-90 वर्षे30 टक्के
03.90-95 वर्षे40 टक्के
04.95-100 वर्षे50 टक्के
05.100 वर्षे त्यापुढील100 टक्के

जुनी पेन्शनबाबत अर्थसंकल्पात तरतुद : राज्यातील शासकीय / निमशासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शनचा लाभ लागु करणेबाबत समितीने दिलेल्या अहवालाचा अभ्यास सुरु असून सदर अहवालानंतर आगामी राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये जुनी पेन्शन लागु करणेबाबतची तरतुद करण्यात येईल असे राज्याचे मुख्यमंत्री यांनी सांगितले आहेत .

दिनांक 31.05.2005 पुर्वी जाहीरात प्रसिद्ध झालेल्यांना जुनी पेन्शनचा लाभ : जे अधिकारी / कर्मचारी हे शासन सेवेत 01.11.2005 नंतर सेवेत रुजु झालेले आहेत , परंतु सदर पदावरची पदभरती बाबतची जाहीरात ही 31 मे 2005 पुर्वीची असल्यास अशांना देखिल जुनी पेन्शनचा लाभ लागु करण्यात येणार आहे , अशा अधिकारी / कर्मचाऱ्यांची संख्या 26 हजार इतकी आहे .

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *