Spread the love

लाईव्ह मराठी पेपर , प्रणिता पवार :  वयाचे 50 वर्षे पुर्ण केलेल्या अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या बाबतीत राज्य विधीभवनांमध्ये मोठी चर्चा झालेली आहे . यांमध्ये वयांच्या 50 वर्षे पुर्ण झालेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांना त्याच्या प्रदीर्घ सेवा लक्षात घेता त्यांना पदोन्नतीसाठी सन 2022 च्या शासन शुद्धीपत्रकामुळे वयाच्या 50 वर्षांनतर सेवानिवृत्तीच्या पुर्वी पदोन्नतीची संधी उपलब्ध होणार आहे .

कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीसंदर्भात विधासभेचे सदस्य मा. जयंत पाटील यांनी असा प्रश्न उपस्थित केला कि 50 वर्षे सेवा पुर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांना विभागीय परीक्षेतुन सुट देणेबाबत न्यायालयीन प्रकरणांमध्ये दोन प्रकरणे न्यायप्रविष्ट आहेत . याबाबत उचित निर्णय होईल का ?

यावर मंत्री महोदय श्री. गुलाबराव पाटील यांनी उत्तर देताना सांगितले कि , सामान्य प्रशासन विभागाकडून निर्गमित करण्यात आलेल्या शासन शुद्धीपत्रकांमुळे राज्य शासन सेवेमध्ये वयाच्या 15 वर्षे सेवा पुर्ण झाल्यानंतर विभागीय परीक्षेपासून सुट मिळणार असल्याने , पदोन्नतीकरीता कनिष्ठ पदांवर किमान काम करण्याची तरतुद रद्द होते , अशी वस्तुस्थितीत धरुन नाही , तर विभागीय परिक्षेच्या धोरण मध्ये 2018 मध्ये तसेच विभागामध्ये हरकती प्राप्त झालेल्या अशा प्रकारची माहिती यावेळी देण्यात आली .

तसेच सन 2018 च्या सुधारित धोरणांमध्ये अधिकारी / कर्मचारी संबंधित पदांवर 15 वर्षे कामाचा अनुभव हा वाक्याचा अर्थ फक्त शासन सेवेत कार्यरत असणाऱ्या पदांवरीलच 15 वर्षे अनुभव हा परीक्षमध्ये सुट देण्यासाठी गणला जात होता , तर कर्मचाऱ्यांस एकुण 15 वर्षे शासन सेवा अभिप्रत आहे , यांमध्ये विशिष्ट पदावरील अनुभव असणाच्या आवश्यक नाही .यासाठी सन 2018 च्या धोरणांमध्ये दिनांक 11.08.2022 रोजीच्या शूद्धीपत्रकांमध्ये विशिष्ट पदावर 15 वर्षांची सेवा या ऐवजी शासकीय सेवामध्ये 15 वर्षे सेवा असणाऱ्या सरकारी अधिकारी / कर्मचाऱ्यांना विभागीय परीक्षेतुन सुट देण्यात येईल , अशा प्रकारची सुधारणा करण्यात आली आहे .

हे पण वाचा : दिनांक 04 ऑगस्ट 2023 रोजी राज्य अधिकारी / कर्मचारी संदर्भात महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित!

यावेळी मा.विधानसभा सदस्य जयंत पाटील बोलताना सांगितले कि , वयांच्या 50 वर्षे पुर्ण केलेल्या अधिकारी / कर्मचाऱ्यांना विभागीय परीक्षा उत्तीर्ण होण्यापासूनच सुट देणेबाबतचा , सन 2018 रोजीचा निर्णय हा प्रशासनांवर प्रतिकूल परिणाम टाकणार आहे .यामुळे यांमध्ये बदल करणे आवश्यक आहे .

या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे ( शरद पवार गटाचे ) प्रदेशाध्यक्ष यांनी केले ट्विट पुढीलप्रमाणे पाहु शकता …

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *