Live marathipepar, संगीता पवार [ NPS Holder State employee, Arjit Leaves] : राज्यातील राष्ट्रीय पेन्शन योजना (NPS ) लागू असणाऱ्या सभासद / सेवानिवृत्त / राजीनामा /नोकरी सोडल्यास निधन झाल्यास महाराष्ट्र नागरी सेवा रजा सुधारणा नियम 2016 मधील तरतुदीनुसार अर्जित रजा रोखीकरण अनुज्ञेय करणे संदर्भात राज्य शासनाच्या वित्त विभागाचे अवर सचिव अनिता लाड यांच्या मार्फत राज्यातील सर्व राज्य अभिलेख देखभाल , अभिकरण संचालनालय लेखा व कोषागारे यांना सदर शासन परिपत्रक सादर करण्यात आले आहेत.
सदर शासन परिपत्रकामध्ये नमूद करण्यात आले आहे की , दिनांक 01 नोव्हेंबर 2005 रोजी व त्यानंतर राज्य शासन सेवेमध्ये रुजू झालेल्या व विहित मार्गाने त्यांच्या सेवा समाप्त ( नियत वयोमानानुसार / मृत्यू / सेवानिवृत्ती इत्यादी ) झालेल्या कर्मचाऱ्यांना अर्जित रजा रोखीकरण बाबत शासन स्तरावरून उचित आदेश होणे संदर्भात विनंती करण्यात आलेली आहे ..
याबाबत नमूद करण्यात आले आहेत की , राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून निर्गमित दिनांक 31 ऑक्टोबर 2005 रोजीच्या शासन निर्णयातील परिच्छेद पाच (ब) मध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की , दिनांक १ नोव्हेंबर 2005 रोजी अथवा त्यानंतर महाराष्ट्र राज्य शासन सेवेमध्ये नियुक्त होणाऱ्या राज्य कर्मचाऱ्यांना नवीन परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना लागू ठरणार आहे . मात्र सध्या अस्तित्वात असलेली निवृत्तीवेतन योजना म्हणजेच महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम १९८२ व महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतनाचे अंशराशिकरण नियम 1984 आणि सध्या अस्तित्वात असलेली सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी योजना त्यांना लागू होणार नाही ..
परंतु दिनांक 01 नोव्हेंबर 2005 रोजी किंवा त्यानंतर राज्य शासन सेवेमध्ये नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र नागरी सेवा रजा नियम 1981 लागू होणार नसल्याबाबत , कोणतेही आदेश शासन स्तरावरून निर्गमित करण्यात आलेले नाहीत . यामुळेच सदर नमूद कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र नागरी सेवा रजा नियम 1981 हे जशाच्या तसे लागू होणार आहेत . अशा प्रकारचे राज्य शासनाच्या अवर सचिव वित्त विभाग , अनिता लाड यांच्याकडुन सादर करण्यात आले आहेत ..
या संदर्भात अवर सचिव वित्त विभाग यांच्याकडून दिनांक 14 जून 2023 रोजी निर्गमित सविस्तर शासन परिपत्रक पुढील प्रमाणे पाहू शकता ..
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.