Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Employee Transfer Shasan Nirnay Gr ] : महाराष्ट्र राज्य शासन सेवेतील कर्मचाऱ्यांच्या बदली संदर्भात राज्य शासनांच्या सामान्य प्रशासन विभागांकडून दिनांक 23 फेब्रुवारी 2024 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय ( GR ) निर्गमित करण्यात आलेला आहे .

आदिवासी त्याचबरोबर दुर्गत भागांमध्ये काम केल्याच्या नंतर सरकारी अधिकारी / कर्मचारी यांची पुढील पदस्थापना त्यांच्या पसंतीच्या ठिकाणी करण्याची सवलत रद्द झाल्या कारणाने या भागामधील नागरिकांना उपलब्ध करुन द्यावयाच्या सुविधांवर होणारे परिणाम विचारात घेवून शासनाने सदर सवलतीबाबत सर्वांगीण विचार करुन सुयोग्य भूमिका घेण्याची निर्देश महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकारणाने दिलेले आहेत .

यामुळे आदिवासी व नक्षलग्रस्त भागांमध्ये काम केल्याच्या नंतर पुढील पदस्थापना पसंतीच्या ठिकाणी देणेबाबत मा.न्यायाधिकारणाने सूचित केल्यानुसार समुचित विचार करुन त्या अनुषंगाने सूचना देण्याची बाब राज्य शासनांच्या विचारधीन होती . यानुसार आता पुढीलप्रमाणे सुचित करण्यात येत आहेत .

बदली अधिनियम सन 2005 मधील कलम 31 (1) नुसार नेमणुकीचा पदावधी पुर्ण झाल्याच्या नंतर सर्वसाधारण बदलीकरीता सरकारी अधिकारी / कर्मचारी पात्र ठरत असतात . त्यानुसार आदिवासी तसेच नक्षलग्रस्त भागांमध्ये अधिकारी / कर्मचारी ज्यावेळी सर्वसाधारण बदली करीता पात्र ठरेल , त्यावेळी त्यांच्या संवर्गाची सेवा ज्येष्ठता यादी ज्या स्तरावर ठेवण्यात येते त्या स्तरांतर्गतच त्यांची बदली करण्याकरीता त्यांच्‍याकडून कमाल चार जिल्ह्यांचा पसंतीक्रम घेण्यात यावा असे सूचित करण्यात आले आहेत .

त्यानंतर संबंधित पसंतीक्रम विचारात घेवूनच त्यांच्या पसंतीच्या जिल्ह्यात सोयाीनुसार बदलीने पदस्थाना देण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत . बदली अधिनियम सन 2005 हा केवळ सरकारी कर्मचाऱ्यांकरीता लागु असल्या कारणाने निमशासकीय कार्यालये त्याचबरोबर शासन अंगीकृत महामंडळे / प्राधिकरण इत्यादी मधील अधिकारी / कर्मचाऱ्यांना त्यांच्या बदली संदर्भात जे नियम लागू असणार आहेत ते बदली बाबतचे सर्व नियम त्याचबरोबर शासनाचे आदिवासी / नक्षलग्रस्त भागातुन बदली करताना पसंतीक्रम विचारात घेण्याचे तत्व या दोन्ही बाबी विचारात घेवूनच प्रशासकीय विभाग त्यांच्या स्तरावरुन योग्य तो निर्णय घेण्यास सक्षम असणार आहेत .

या संदर्भात सामान्य प्रशासन विभागांकडून दिनांक 23.02.2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे पाहु शकता ..

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *