Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ state govt. developing works stop ] : राज्यात विविध विकास कामांचे निविदा राज्य सरकारकडून काढण्यात आलेले आहेत , परंतु सदर विकासकामे पुर्ण करण्याकरीता राज्य सरकारकडे पैसाच शिल्लक नसल्याने , आता सदर विकास कामे रखडणार आहेत , त्या विरोधार राज्यातील कंत्राटदारांकडून राज्य सरकार विरोधात दि.30 सप्टेंबर पासुन काम बंदचा इशारा देण्यात आलेला आहे .
राज्य सरकारने लाडकी बहीण योजना सुरु केली आहे , सदर योजना अंतर्गत राज्यातील महिलांना दरमहा 1500/- रुपये दिले जात आहेत , सदर योजना अंतर्गत आता पर्यंत 02 हप्ते अदा केले गेले आहेत , तर तिसरा हप्ता दिनांक 29 सप्टेंबर पासुन पात्र महिलांच्या बँक खात्यांमध्ये वर्ग केले जाणार आहेत , परंतु सदर योजनांमुळे आता राज्य सरकारकडे पैसाच शिल्लक राहीला नाही .
राज्य सरकारकडून विविध विकासकामे पुर्ण करण्याकरीता काढण्यात आलेल्या कंत्राटदारांकडून सदर विकास कामे दिनांक 30 सप्टेंबर पासुन बंद करण्यात येणार आहेत . तर दिनांक 08 ऑक्टोंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर कंत्राटदारांकडून आंदालने करण्यात येणार असल्याची माहिती कंत्राटदार संघटनेचे अध्यक्ष मिलिंद भोसले यांनी दिली आहे .
कंत्राटदारांच्या प्रमुख मागण्या : राज्यातील सर्वच विभाग मधील विकास कामांच्या तब्बल 40 हजार कोटी रुपयांचे देयके हे तात्काळ अदा करण्यात यावेत . यापुढे राज्य शासनांकडे 100% निधी उपलब्ध असल्याशिवाय कामे मंजूर करण्यात येवू नयेत , छोट्या प्रमाणात असणारे कामे हे नियम बाह्य पद्धतीने मोठ्या कंत्राटदारांना देण्यात येवू नयेत . राज्यातील कंत्राटदारांचे संरक्षण व्हावेत याकरीता नविन कायदा मंजुर करण्यात यावा .
कंत्राटदारांच्या सदर निर्णयांमुळे राज्यातील विकास कामांस दिनांक 30 सप्टेंबर 2024 पासुन रोख लागणार आहे . यामुळे आता सदर निर्णयावर राज्य सरकार नेमके कोणता निर्णय घेतले याकडे कंत्राटदारांचे लक्ष वेधले आहेत .