Live Marathipepar संगिता पवार [ Cabinet Meeting Nirnay ] : आज दिनांक 08 नोव्हेंबर 2023 रोजी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली , यांमध्ये राज्यातील नागरिकांच्या हिताचे 11 मोठे महत्वपुर्ण निर्णय घेण्यात आले आहेत .मंत्रीमंडळ बैठकीमध्ये घेण्यात आलेले 11 महत्वपुर्ण निर्णय पुढीलप्रमाणे पाहुयात ..
- यांमध्ये धनगर समाच्या उन्नतीकरता योजना ह्या प्रभावीपणे राबविण्यात येणार आहेत , यांकरीता इतर मागास बहुजन कल्याण विभागांकडून शक्तीप्रदत्त समितीमार्फत सनियंत्रण करण्यात येणार आहेत .
- तसेच राज्यातील व्यापाराला चालना देण्याकरीता निर्यातील अधिक वेग देण्यात येणार आहेत , याकरीता शेतकऱ्यांना निर्याल करता यावी यासाठी निर्यात प्रोत्साहन धोरण मंजुर करण्यात येवून 425 कोटी इतक्या निधीची तरतुद करण्यात आली आहे .
- वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर तालुक्यातील बॅरेजेसना मान्यता देण्यात आली असल्याने सदर जिल्ह्यातील गावांना मोठा फायदा होणार आहे , यांमध्ये तब्बल 2200 हेक्टरपेक्षा अधिक जमीन ही सिंचनाखाली येणार आहे .
- राज्यातील वस्त्रो-उद्योग प्रकल्पांना सामुहिक रित्या प्रोत्साहन मिळावे याकरीता प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे .
- संत्री उत्पादकांना फायदा व्हावा याकरीता विदर्भात 05 ठिकाणी आधुनिक संत्रा प्रक्रिया केंद्र उभरण्यास मान्यता देण्यात आली आहे .
- महाराष्ट्र राज्याची माहिती देणारे पर्यटक केंद्र आणि बहुउद्देशिय संकुल मॉरिशस येथे पर्यटन विभागांकडून उभारण्यात येणार आहेत .
- नरिमन पॉईंट येथे स्थित एअर इंडियाची इमारत ताब्यात घेण्याकरीता एअर इंडियाचे सर्व प्रकारचे दंड तसेच अनर्जित उत्पन्न माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे .
- गणित तसेच विज्ञान विषयांमध्ये विद्यार्थ्यांना पारंगत करण्यासाठी राज्यातील आश्रमशाळांमध्ये शिक्षकांची अतिरिक्त 282 पदे भरण्याचा मोठा निर्णय इतर मागास बहुजन कल्याण विभागांकडून घेण्यात आला आहे .
- तसेच अनुदानित खासगी तत्वावर असणारे आयुर्वेद तसेच युनानी महाविद्यालयांमध्ये अध्यापकांची पदे ही राज्य निवड मंडळ मार्फत भरण्यात वैद्यकीय शिक्षण विभागाला मान्यता देण्यात आली आहे .
सदरच्या मंत्रीमंडळ बैठकीमध्ये राज्यातील कर्मचाऱ्यांना वाढीव महागाई भत्ताचा लाभ अनुज्ञेय करण्यात येईल अशी सर्वांची अपेक्षा होती , परंतु राज्य शासनांने राज्यातील कर्मचाऱ्यांच्या डी.ए मध्ये वाढ करणेबाबत , कोणताही निर्णय घेण्यात आला नाही , यामुळे डी.ए वाढीबाबतचा निर्णय नव्याने घेण्यात येईल .