Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Government Working imp Shasan Nirnay ] : शासकीय कामकाजांमध्ये एनआयसीच्या ई-मेलचा वापर करणे संदर्भात राज्य शासनांच्या सामान्य प्रशासन विभागांकडून दिनांक 07 फेब्रुवारी 2024 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
केंद्र शासनाच्या माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाची ई-मेल पॉलिसी , ऑक्टोंबर 2014 नुसार केंद्र शासनांतर्गत एनआयसी यांनी उपलब्ध करुन दिलेल्या शासकीय ई-मेल सेवेचा वापर राज्य शासनाच्या कामकाजात करणे बंधनकार असणार आहे , त्यानुसार सर्व शासकीय अधिकारी / कर्मचारी यांना शासनाच्या दैनंदिन कामकाजाकरीता एनआयसीचे ई-मेल आयडी यापुर्वीच उपलब्ध करुन देण्यात आलेले आहेत .
तथापी अद्यापही मंत्रालयात तसेच काही क्षेत्रीय कार्यालयांकडून NIC च्या ई-मेलचा 100 टक्के वापर होत नसल्याचे राज्य शासनांच्या निदर्शनास आलेले आहे , म्हणून सबब भविष्यात सायबर ॲटक अथवा हॅकिंग यामुळे शासनाच्या संवेदनशी तसेच गोपनिय माहीतीचा दुरुपयोग होऊ शकतो सदर बाब लक्षात घेता सर्व क्षेत्रीय कार्यालयातील अधिकारी / कर्मचारी यांना पुढीलप्रमाणे निर्देश देण्यात आलेले आहेत .
शासकीय कामकाजाकरीता मेल करताना खाजगी अथवा अनय कोणत्याही ई-मेलचा वापर न करता एनआयसीच्या ई-मेलचा वापर करताना खाजगी अथवा अन्य ई-मेल Whatsapp , Messaging अथवा तत्सम Platform वर डाऊनलोड करण्यात येणार नाही , याची दक्षता देखिल सर्व संबंधितांनी घेण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत , तसेच उपरही असे करताना एखादा कर्मचारी निदर्शनास आल्यास तो शिस्तभंग विषयक कार्यवाहीस पात्र असणार आहे . या संदर्भात सामान्य प्रशासन विभागांकडून निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे पाहु शकता ..
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.