Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State Government Various Scheme ] : राज्य शासनांकडून राज्यातील महिला / मुलींसाठी विविध प्रकारचे शासकीय योजना राबविण्यात येत असतात , ज्यामधून महिला / मुलींना आर्थिक तसेच सामाजिक सुरक्षा प्राप्त होते , सदरच्या योजना ह्या महिला व बाल विकास विभागांकडून राबविण्यात येत असतात , सविस्तर योजनांची माहिती पुढीलप्रमाणे पाहुयात ..
माझी कन्या भाग्यश्री योजना : या योजनेचे सुरुवात ही दि.01.08.2017 पासून करण्यात आली असून सदर योजना अंतर्गत मुलींना आर्थिक सहाय्य देण्यात येते , यांमध्ये एक मुलगी असल्यास त्यास 18 वर्षे कालावधीकरीता 50,000/- तर दोन मुली करीता प्रत्येक मुलीचे नावे 25,000/- रुपये दिले जाते ,याकरीता कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 7.50 लाख पेक्षा अधिक असू नयेत , तसेच माता – पित्याने कौटुंबिक नियोजन प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक असेल .
बेटी बचाओ बेटी पढाओ योजना : या योजना अंतर्गत राज्यातील बीड , जळगाव , अहिल्यानगर , छ.संभाजीनगर , बुलढाणा , कोल्हापुर , धाराशिव , सांगली व जालना अशा 10 जिल्ह्यांमध्ये बालक लिंग गुणोत्तर वृद्धींगत करण्याच्या उद्देशाने राज्यात महिला आणि बालकं विकास विभागाने केंद्र शासनाची वरील जिल्ह्यांमध्ये योजना राबविण्यात येते . यांमध्ये मुलींच्या जिविताची आणि संरक्षणाची खातरजमा केले जाते , तसेच मुलींच्या शिक्षणाची आणि सामाजिक सहभागाची खातरजमा केली जाते , तसेच पुर्वग्रहदूषित दृष्टीकोनामुळे होणाऱ्या लिंग निवडीला प्रतिबंध केले जाते . दिनांक 16.06.2018 पासुन राज्यातील सोलापुर , पुणे , नाशिक , लातुर , हिंगोली या जिल्हा अतिरिक्त समावेश करण्यात आलेला आहे .
बाल संगोपन संस्था : महिला व बाळाच्या वास्तविक वा जिविताच्या तसेच व्यक्तित्व आणि बाल्याला असणारे धोक्यापासून रक्षण करणे , कोणत्याही प्रकारचे नुकसान होऊ नयेत म्हणून मुलांचा दुबळेपणा कमी करणे आणि एकही मूल सामाजिक सुरक्षा कवचाच्या बाहेर जाणार नाही याची काळजी घेण्यासाठी बाल संगोपन संस्था स्थापन करण्यात आलेले आहेत .
महिला समुपदेशन केंद्र : अत्याचर पिडितांना ( यांमध्ये महिला व बालके ) झालेल्यांना मानसिक आघातामधून बाहेर काढण्यासाठी त्यांना समुपदेशनाची मदत पुरविण्याकरीता महिला समुपदेशन केंद्राची स्थापना करण्यात आलेली आहे .
अत्याचारग्रस्त पिडीत महिलांकरीता सावित्रीबाई फुले बहूउद्देशीय महिला केंद्र : अत्याचार पिडीत महिलांना सल्ला आणि मार्गदर्शन पुरविण्याकरीता , तसेच सदर पिडीतांकरीता ही केंद्र मार्गदर्शन आणि कायदेशीर मदतीबाबत सल्ला मिळण्याचे तसेच रोजगार आणि व्यावसायिक प्रशिक्षण मिळण्याचे ठिकाण याकरीता सदर केंद्राची स्थापना करण्यात आलेली आहे .
बाल सल्ला केंद्र : मुलांच्या सर्जनशील क्षमतांच्या विकास करीता सदर बाल सल्ला केंद्राची स्थापना करण्यात आलेली आहे . ज्यांमध्ये विविध उपक्रम करण्यासाठी , संधी आणि संवाद साधण्यासाठी , प्रयोग करण्यासाठी , नवनिर्मितीकरीता तसेच त्यांच्या क्षमता आणि आवडीनुसार सादरीकरण करुन दाखविण्यासाठी सामायिक व्यासपीठ उपलब्ध करुन देण्यात आलेले आहेत .
बाल संगोपन योजना : मुलांचे पालक अनेक कारणांमुळे जसे कि विकार ( यांमध्ये दीर्घकालीन आजार ) मृत्यु , विभक्त होणे , दोन्ही पैकी एका पालकाने सोडून जाणे अथवा काही अन्य कारणांने विभक्त होणे , अन्य काही आपत्तीमुळे त्यांची काळजी घेण्यास असमर्थ असतात , त्यांना तात्पुरते दुसरे कुटुंब उपलब्ध करुन देण्याकरीता बाल संगोपन योजना ( मुलांसाठी कौटुंबिक देखभाल ) राबविण्यात येते . .
काम करणाऱ्या महिलांच्या मुलांकरीता राजीव गांधी राष्ट्रीय पाळणाघर योजना : काम करत असणाऱ्या महिलांच्या मुलांकरीता शाळा पुर्व मुलांना आवश्यक ती प्रबोधनपर खेळणी तसेच शैक्षणिक साहित्य पुरविण्यात येते , याकरीता मुलांना पाळणाघर उपलब्ध करुन देण्यात येते .
इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना : या योजना अंतर्गत गर्भवती आणि स्तनपान कालावधीमध्ये महिलांना वेतन नुकसान भरपाई म्हणून रोख रक्कम देणे तसेच त्यांना पोषक आहार उपलब्ध करुन त्यांच्या आरोग्याची स्थिती सुधारली जाते .
अनाथालय , महिला स्वीकृती केंद्र आणि संरक्षित गृहे यामधील निराधार आणि परित्यक्ता विधवांच्या मुलींच्या विवाहाकरीता अनुदान : वरील निराधार आणि परित्यक्ता विधवांच्या मुलींच्या विवाहाकरीता 25,000/- रुपये अनुदान देण्यात येते .
किशोरी शक्ती योजना : वारंवारं मुलांना जन्म देण्याचे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम त्याचबरोबर संतुलित आहाराची आणि हिरव्या पालेभाज्या खाण्याची आवश्यकता इ.बाबतचे आरोग्य आणि स्वच्छते संबंधित शिक्षण तसेच प्रशिक्षण देणे बाबत सदरची योजना राबविण्यात येते .
इतर योजना :
- निराश्रित महिलां , किशोरवयीन माता , तसेच अत्याचार पिडीत महिलांकरीता राज्य महिला गृहे – वय वर्षे 18 ते 60 वर्षाकरीता …
- देवदासी कल्याण योजना
- निराश्रित महिलांकरीता आधार गृहे
- किशोरवयीन मुलींकरीता योजना
- शुभ मंगल सामुहिक विवाह योजना