Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ state government salary package account ] : राज्य शासकीय / निमशासकीय अधिकारी / कर्मचारी यांना राष्ट्रीयकृत बँकांच्या State Government Salary Package ( SGSP ) या वेतन खात्याशी संलग्न अपघात विमा योजनाबाबत अवगत करणेबाबत , वित्त विभागकडुन दिनांक 31.08.2020 रोजी परिपत्रक निर्गमित करुन सर्व अपर मुख्य सचिव / प्रधान सचिव सर्व मंत्रालयीन विभाग यांच्या प्रति निवेदन सादर करण्यात आले आहेत .
सदरच्या परिपत्रकांमध्ये नमुद करण्यात आले आहेत कि , शासकीय / निशासकीय / कर्मचारी यांच्या वेतन बँक खात्याशी संलग्न अशा अपघात विमा विषयक लाभ आधारीत योजना विविध बँकाकडून राबविण्यात येत आहेत . काही बँकाकडून वित्त विभागाकडे शासकीय अधिकारी / कर्मचारी यांची वैयक्तिक वेतन खाती उघडण्यास मान्यता देण्या संदर्भात प्रस्ताव प्राप्त झालेले आहेत .
तसेच शासकीय अधिकारी / कर्मचारी यांचे वेतन खाते कोणत्या बँकेत असावे , याबाबत शासन काणतेही निर्देश देवू शकत नाही , तथापि वेतन खात्याशी संलग्न असणाऱ्या अपघात विमा विषयक विविध योजना अंतर्गत अधिकारी / कर्मचारी यांच्या वैयक्तिक फायद्याच्या आहेत .
त्या करीता बँकाकडून कोणतेही वेगळे शुल्क आकारले जात नाहीत . त्यामुळे काही राष्ट्रीयकृत बँकांकडून प्राप्त State Government Salary Package अंतर्गत अपघात विमा योजनांच्या लाभ मिळण्या संदर्भात अधिकारी / कर्मचारी यांना अवगत करणे योग्य वाटते , आवश्यक माहिती अभावी शासकीय अधिकारी / कर्मचारी यांच्या वेतन खात्याशी संलग्न असणाऱ्या अशा योजनांपासून वंचित राहू नये अशी यामागे भमिका आहे असे स्पष्ट करण्यात आले आहेत .
अधिकारी / कर्मचारी यांचे वेतन खाते कोणत्या बँकेत असावेत , याबाबतचा निर्णय हा कर्मचाऱ्यांने वैयक्तिक रित्या घ्यावयाचा आहे . विविध राष्ट्रीयकृत्त बँकेकडून सदर SGSP पॅकेज खात्यावर देण्यात येणारे विविध लाभ याबाबत सविस्तर माहिती खालील विवरण पत्रांमध्ये नमुद केल्यानुसार आहेत .
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.