Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ state government employee news ] : राज्यााचे मा.मुख्यमंत्री यांना आता राज्यातील अधिकारी / कर्मचाऱ्यांना टार्गेट केले आहेत . यांमध्ये कर्मचाऱ्यांना आता आपल्या कामाशिवाय अत्यावश्यक कामे पुर्ण करावे लागणार आहेत .
आता सरकारी कर्मचाऱ्यांना राज्याचे मा.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक प्रकारची चेतावणी दिली आहे . या चेतावणीनुसार , अनावश्यक कागदांचे ढिग रिकामे करा, पेंडींग कामांची संख्या शुन्यावर आणण्याची तसेच कार्यालयांची सफाई करण्याचे , त्याचबरोबर वाहनांचे भंगार साफ करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .
याशिवाय कार्यालय स्वच्छ ठवणे , पिण्याचे पाणी, प्रधासनगृहे स्वच्छ राहतील , अशा प्रकारचे नियोजन कामकाज करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत . या करीता अधिकाऱ्यांच्या सरप्राईज भेटीचे नियोजन करण्याचे निर्देश देण्यात आले असून , त्यावेळी कार्यालय / आवार स्वच्छ दिसले पाहीजेत .
अन्यथा संबंधित अधिकारी / कर्मचाऱ्यांवर कार्यवाही केली जाईल असे निर्देश देण्यात आले आहेत . याबाबत राज्याचे मा.मुख्यमंत्री यांनी व्हीसीद्वारे राज्यातील सर्व जिल्हाधिकारी , पालिका आयुक्त , विभागीय आयुक्त तसेच पोलिस आयुक्त / अधिक्षक यांच्याशी संवाद साधून सुचित करण्यात आले आहेत .
यांमध्ये मुख्यमंत्र्यांने 100 दिवसांमध्ये प्रथम प्राधान्याने करावयाची कामे सांगितले असून , यांमध्ये राज्यातील सरकारी यंत्रणामधील पेंडिंग कामे शुन्यावर आणण्याचा प्रमुख मानस आहे . तसेच कार्यालयातील स्वच्छता सुनिश्चित करण्याच्या अनुषंगाने अधिकाऱ्यांच्या सरप्राईज भेटीची आयोजन करण्यात आले आहेत .
तसेच लोकशाही दिनासारखे नविन उपक्रम राबविण्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले आहे . तसेच सदर आदेशांमध्ये असेही नमुद करण्यात आले आहेत कि , आरोग्य केंद्र , अंगणवाडी , शाळा अशा गाव पातळीवर भेटी झाल्या पाहीजेत असे निर्देश देण्यात आले आहेत .