Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State Farmers Gets Electricity Just 2 ruppes Only Nirnay ] : राज्य सरकारने लोकसभा निवडणुकांच्या पाश्वभुमीवर शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा करण्यात आलेली आहे . राज्यातील शेतकऱ्यांना आता 24 तास अगदी स्वस्त फक्त 2 रुपयांमध्ये वीजपुरवठा करण्यात येणार आहेत , या निर्णयामुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे .
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा उर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या घोषणांनुसार शेतकऱ्यांना 2.87 रुपये ते 3.10 रुपयांमध्ये वीज पुरवठा करण्यात येणार आहे . याकरीता राज्य सरकारला 7.50 रुपये प्रति युनिट ऐवढा खर्च येणार आहे , यामुळे शेतकऱ्यांचा हा मोठा खर्च वाचणार आहे . या निर्णयामुळे पाण्याची देखिल बचत होणार आहे .
सविस्तर माहिती जाणून घ्या : शेतकऱ्यांना वीज देण्याकरीता मागील 11 महिन्यांमध्ये प्रक्रिया पुर्ण करण्यात आलेली आहे , तरी काही पुर्वरित काम पुढील दीड वर्षांमध्ये पुर्णत्वास येणार आहेत . एकुण कृषी फिडर यापैकी 50% फिडर हे पुढील वर्षांपर्यंत सोलर होतील , तर आत्तापर्यंत 50 टक्के फिडर हे सोलर करण्यात आलेले आहेत , अशा प्रकारचे काम होणारे महाराष्ट्र हे प्रथम राज्य असणार आहेत , जे कि 100 टक्के कृषी वीज निर्मिती आहे ही सोलरवर त्या ठिकाणीच्या ट्रान्सफॉर्म होणार आहे , त्यामुळे खर्चांची बचत देखिल होणार असल्याची माहिती राज्य सरकारकडून दिली आहे .
सध्या राज्य सरकारकडून 13 हजार कोटी रुपये इतका खर्च विजबील सबसिडीवर देण्यात येत असतो , परंतु शेतकऱ्यांना सौर पंप दिल्यानंतर हा मोठा खर्च सरकारचा वाचणार आहे . सदरच्या प्रकल्पाकरीता राज्य सरकारकडून तब्बल 40 हजार कोटी रुपयांची गुंतवणुक करण्यात येणार असून यातुन तब्बल 25 हजार तरुणांना रोजगार निर्मिती होणार असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे .
राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी दिलेल्या माहितीनुसार , राज्य सरकारने आत्तापर्यंत दीड लाख पंप शेतकऱ्यांना देण्यात आलेले आहेत , तर पुढील वर्षापर्यंत आणखीण 8 लाख सौलर पंप मंजुर करुन पुरवठा करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आलेली आहे , ज्यामुळे शेतकऱ्यांना चोविस तास विज पुरवठा होणार आहे .