Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ state farmer loan free & crop insurance nirnay ] : राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी व पिक विम्याची भरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे , उद्यापासून राज्याचे हिवाळी अधिवेशनास सुरुवात होणार आहे . या अधिवेशनांमध्ये वरील मुद्द्यावर विरोधी अधिक आक्रमक भूमिका घेणार असल्याने , शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे .
पिक विम्याची भरपाई : राज्यातील शेतकऱ्यांना पिक विम्याची भरपाई मिळणार आहे , यांमध्ये स्वतंत्र भारत पक्ष व शेतकरी संघटना महिला आघाडीमार्फत राज्यातील जिल्हा कृषी अधिक्षक कार्यालयांना टाळे ठोकण्याचा इशारा देण्यात आलेला आहे , राज्यांमध्ये काही जिल्ह्यात पिक विम्याची भरपाई देण्यात आलेली आहे , तर उर्वरित जिल्ह्यात पिक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये वर्ग करण्यात आलेली नाही .
याकरीता राज्य शासनांकडून उर्वरित जिल्ह्यातील पिकांची झालेल्या नुकसान भरपाईसाठी निधीची तरतुद पावसाळी अधिवेशनांमध्ये उपलब्ध करुन देण्यात येणार आहे . या मुद्यांवर विरोधक आक्रमक भुमिका घेणार असल्याने , याबाबत निर्णय घेतले जाणार आहेत .
कर्जमाफी : शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी राज्य शासनांकडून विविध कर्जमुक्ती योजनां राबविण्यात येतात , या कर्जमुक्ती योजनांसाठी निधींची उपलब्ध करुन दिली जाणार आहे , तेलंगणा राज्य सरकारच्या धर्तीवर राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात यावी , याबाबतची घोषणा पावसाळी अधिवेशनांमध्ये करण्यात यावी अशी भूमिका अनिल देशमुख यांची आहे .
तेलंगणा राज्य सरकारने सरसकट कर्जमाफी दिली आहे , यामुळे तेथाील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे , यामुळे कोणत्याही प्रकारची अटी / शर्ती न लावता सरसकट कर्जमाफी देण्याची मागणी विरोधकांकडून केली जात आहे .
खास शेतकऱ्यांसाठी नियमित हवामान अंदाज, कृषी बाजारभाव, कृषि योजना बाबत नियमित अपडेट मिळवण्यासाठी खालील WhatsApp ग्रूप मध्ये सामील व्हा !