निवडणुकापुर्वीच राज्यातील शेतकऱ्यांना मिळाले “हे” मोठे 05 आर्थिक फायदे ; जाणून घ्या सविस्तर !

Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Farmer benefit before Election ] : राज्यातील शेतकऱ्यांना निवडणुकांच्या तोंडावर असताना अनेक आर्थिक लाभ मिळाले आहेत . ज्यांमध्ये राज्य शासनांकडून वेळोवेळी शासन निर्णय तसेच अधिकृत्त निर्णय घेवून घोषणा करण्यात आलेली आहे , या संदर्भातील सविस्तर निर्णय पुढीलप्रमाणे पाहुयात ..

नैसर्गिक आपत्तीमुळे बाधीत शेतकऱ्यांचे कर्जमाफ : राज्यांमध्ये माहे जुलै 2019 ते माहे ऑगस्ट 2019 या काळांमध्ये अतिवृष्टी झाली होती , यामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पिक कर्ज माफ करण्याच्या योजना अंतर्गत दिनांक 28 फेब्रुवारी 2024 रोजी अधिकृत्त शासन निर्णय निर्गमित करुन 379.99 लाख रुपये इतका निधी वितरीत करण्यास मंजूर देण्यात आलेली आहे , तर पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना कर्जमाफी करीता सदर निधी खर्च करण्यास निर्देशित करण्यात आलेले आहेत . सदरचा शासन निर्णय पाहण्यासाठी .. CLICK Here

नमो शेतकरी महासन्मान निधी योजनाचा 2 व तिसरा हप्त्यासाठी निधीचे वितरण : नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही एक राज्य सरकारची योजना असून , पंतप्रधान शेतकरी सन्मान योजना सारखे राज्यातील शेतकऱ्यांना 6,000 रुपये प्रतिवर्षी लाभ लागु होतात , यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना वरील दोन्ही योजना अंतर्गत एकुण 12,000/- रुपये प्रति वर्ष आर्थिक लाभ मिळतो . या योजना अंतर्गत राज्य शासनांने दुसरा व तिसरा हप्ता वितरीत करण्यासाठी निधीचे विरण करणेबाबत अनुक्रमे 21.02.2024 व 23.02.2024 रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे , यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना दुसरा व तिसरा हप्ता मिळण्यास सुरुवात झाली आहे . Gr पाहण्यासाठी CLICK Here

दुष्काळामुळे खरीप हंगाम 2023 करीता शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदान : खरीप हंगाम 2023 मधील दुष्काळामुळे झालेल्या पिकांचे नुकसानीकरीता बाधित झालेल्या शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदान देणेकरीता दिनांक 29.02.2024 रोजी अधिकृत्त शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . सदर निर्णया अंतर्गत बाधित शेतकऱ्यांकरीता एकुण 244322.71 लक्ष रुपये इतका निधी वितरीत करण्यास मंजूरी देण्यात आलेली आहे . जिल्हा व तालुक्यानिहाय अनुदान पाहण्यासाठी सविस्तर शासन निर्णय वाचण्यासाठी .. CLICK Here

माहे डिसेंबर व जानेवारी 2024 या कालावधी पिकांची नुकसान भरपाई करीता मदत निधी : माहे डिसेंबर व माहे जानवोरी 2024 या कालावधीमध्ये राज्यातील शेतकऱ्यांना अवेळी पाऊस यामुळे शेती पिकांचे झालेले नुकसान भरपाई करीता मदत निधींचे वितरण करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे . याबाबत शेतकऱ्यांना मदत निधी वितरीत करणेबाबत दिनांक 04.03.2024 शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे , सविस्तर निर्णय पाहण्यासाठी .CLICK Here

Leave a Comment