Spread the love

Live marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ E-kuber pranali] : राज्यातील वर्गातील वर्ग 3 व वर्ग 4 कर्मचाऱ्यांच्या वेतन देयक संदर्भात राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाकडून दिनांक 7 मे 2024 रोजी महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे , सदर परिपत्रक राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाकडून माननीय संचालक लेखा व कोषागारे यांच्या प्रति सादर करण्यात आला आहे  .

सदर परिपत्रकानुसार जिल्हा परिषदेतील वर्ग 3 व वर्ग 4 कर्मचाऱ्यांच्या (शिक्षक कर्मचारी वगळून ) वेतन देयकांचे प्रदान यापुढे ई – कुबेर प्रणाली द्वारे करावयाच्या असल्याने , पंचायतराज सेवार्थ टीमने सदर प्रणालीतील कर्मचाऱ्यांची माहिती ई – कुबेर प्रणालीशी संलग्न करण्याची कार्यवाही करण्यास सुरुवात केली आहे .

याबाबत पंचायतराज सेवार्थ टीमने ही टेस्टिंगसाठी फाईल लेखा व कोषागार यांच्याकडे पाठवली असून , यासोबत मॅपिंगसाठी व बीम्स इंटिग्रेशन मध्ये कोणती अपडेट करण्याची आवश्यकता आहे याची माहिती देणे आवश्यक असणार आहे .

पंचायत राज सेवार्थ प्रणाली ही ई – कुबेर प्रणालीशी संलग्न करण्यासाठी व वरील सर्व तांत्रिक बाबींची पूर्तता होण्यासाठी काही कालावधी लागणार असल्याने , सदर बाबींची पूर्तता होईपर्यंत पंचायतराज सेवार्थ प्रणाली मार्फत होणारी जिल्हा परिषदेतील सर्व वर्ग 3 व वर्ग 4 कर्मचाऱ्यांच्या शिक्षक कर्मचारी वगळून वेतन देयके ही प्रचलित पद्धतीनेच स्वीकारण्याची सूचना सर्व जिल्हा कोषागार अधिकाऱ्यांना आपल्या स्तरावरून देण्यास विनंती करण्यात आली आहे .

या संदर्भात ग्राम विकास विभागाकडून दिनांक 7 मे 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर परिपत्रक पुढील प्रमाणे पाहू शकता.

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *