Spread the love

Live marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ old pension scheme cm aiknath shinde ashvasan new update ] : विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील 01 नोव्हेंबर 2005 नंतर रुजू झालेल्या शिक्षकांना जुनी पेन्शन योजना ( old pension scheme) लागू करण्यात येणार , असे आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना दिले आहे .

निवडणुकीच्या तोंडावर फक्त आश्वासने : लोकसभा निवडणुकीच्या अगोदर राज्य सरकारने सुधारित पेन्शन योजना लागू करण्याची घोषणा विधानसभेमध्ये करण्यात आली . परंतु यावर अधिकृत शासन निर्णय /  अधिसूचना निर्गमित करण्यात आली नाही . तर विधान परिषद निवडणुकीच्या अगोदर शिक्षक मतदारांना आकर्षित करण्याकरिता 01 नोव्हेंबर 2005 नंतर रुजू झालेल्या शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करू असे ,  आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतेच पत्रकारांशी संवाद साधताना दिले आहेत .

राज्य सरकारकडून निवडणुकीच्या अगोदर केवळ आश्वासने दिले जात आहे .  परंतु यावर ठोस निर्णय घेतला जात नसल्याने , कर्मचाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजगी आहे . मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेले आश्वासन कितपत पाळतात हे निवडणुकीनंतर समजून येईल .

नोव्हेंबर 2005 नंतर शासन सेवेत रुजू झालेल्या शिक्षकांना पूर्वीप्रमाणे जुनी पेन्शन योजना लागू केली जाणार असल्याचे नमुद करण्यात आले आहेत , यामध्ये पूर्वीप्रमाणे सर्व लाभ लागू केले जाणार आहेत . विधानपरिषद निवडणूक मध्ये शिक्षक आमदारांना फायदा व्हावा याकरिता शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याचे आश्वासन देण्यात आले आहेत .

त्याचबरोबर राज्यातील आदिवासी विभाग अंतर्गत येणाऱ्या आश्रमशाळेच्या वेळा पूर्वीप्रमाणे 11 ते 5 करण्यात येईल असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून देण्यात आले आहेत . निवडणुकीच्या तोंडावर केवळ आश्वासने दिले जात असून , यावर ठोस निर्णय घेतला जात नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये सरकार प्रती तीव्र नाराजगी आहे .  याचा परिणाम म्हणून कर्मचारी निवडणुकीमध्ये आपली नाराजी दाखवून देतील असे कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी यांनी सांगितले आहे.

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *