Live marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ state employee old pension demand update ] : सध्या राज्याची विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने , महाविकास आघाडी पक्षाकडून राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सत्ता स्थापनेनंतर जुनी पेन्शन योजना (Old pension scheme ) लागू करण्याची तरतूद जाहीरनाम्यामध्ये करण्यात आली आहे .
महाविकास आघाडी सरकारने प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्यामध्ये , राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सत्ता स्थापनेनंतर , जूनी पेंशन योजना (OPS) जसेच्या तसे लागू करण्याचे , आश्वासन देण्यात आली आहे . यामुळे राज्यातील एनपीएस धारक कर्मचारी यांचा कल जूनी पेन्शन मुद्याकडे अधिक केंद्रित होणार हे निश्चित आहे.
विद्यमान महायुती सरकारकडून राष्ट्रीय पेन्शन योजनेमध्ये सुधार करून सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना त्याचबरोबर केंद्र सरकारने लागू केलेली युनिफाईड पेन्शन योजना लागू करण्याचा पर्याय राज्य कर्मचाऱ्यांना उपलब्ध करून देण्यात आला आहे . परंतु सदर दोन्ही सुधारित पेन्शन योजनेमध्ये जुनी पेन्शन (old pension) प्रमाणे लाभ मिळत नसल्याने , राज्य कर्मचाऱ्यांची जुनी पेन्शन योजनाची मागणी कायम आहे .
त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेच्या वतीने जो पक्ष जुनी पेन्शन लागू करेल , त्या पक्षाला मतदान करण्याचे आव्हान कर्मचाऱ्यांना करण्यात आली आहे . याकरिता राज्यात Vote For OPS अशी अभियान सदर संघटनेच्या वतीने राज्यभर राबविण्यात येत आहे .
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.