Spread the love

Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ state employee demanded old pension scheme ] : राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना हवी असणारी जुनी पेन्शन योजना जशाच्या तशी लागू करण्याचे , महाविकास आघाडी पक्षाकडून आश्वासने दिली जात आहेत . शिर्डी येथे राज्य कर्मचाऱ्यांच्या महा- पेन्शन अधिवेशनात , शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) गटाचे अध्यक्ष श्री.उद्धव ठाकरे यांनी केलेल्या घोषणांच्या अनुषंगाने , विधानसभा निवडणूकीच्या जाहीरनाम्यात कर्मचाऱ्यांच्या जुन्या पेन्शनची बाब नमूद करण्यात आली आहे .

राज्य शासन सेवेत दिनांक 01 नोव्हेंबर 2005 नंतर रुजू झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना (Old pension scheme) ऐवजी राष्ट्रीय पेन्शन योजना (NPS ) लागू केली आहे . तर विद्यमान महायुती राज्य सरकारने , राज्य कर्मचाऱ्यांना सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना ( New NPS) व केंद्र सरकारने लागू केली एकीकृत पेन्शन योजना ( UPS ) यापैकी एक पेन्शन प्रणाली निवडण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे .

परंतु या दोन्हीही सुधारित पेन्शन योजनेमध्ये कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर जुनी पेन्शन प्रमाणे , पेन्शन लाभ मिळणार नसल्याने , राज्य कर्मचाऱ्यांची जुनी पेन्शनची मागणी मोठ्या प्रमाणात होत आहे . यासाठीच राज्यात महाविकास आघाडीची सत्ता स्थापन झाल्यास , राज्य कर्मचाऱ्यांना हवी असणारी जुनी पेन्शन योजना जशाच्या तशी लागू करण्याचे आश्वासन दिले जात आहेत .

यासाठी राज्य कर्मचाऱ्यांकडून देखील Vote For OPS अशी अभियान राज्यभर राबवली जात आहे , म्हणजेच जो पक्ष जुनी पेन्शन योजना ( Old pension) लागू करेल अशाच पक्षाला मतदान देण्याचे , आव्हान कर्मचारी संघटनेकडून राज्यातील 17 लाख कर्मचाऱ्यांना करण्यात येत आहे .

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *