Spread the love

Live marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ state employee old pension] : लोकसभा निवडणुकीच्या निकालामध्ये भारतीय जनता पार्टीला [ BJP ] महाराष्ट्र राज्यात दारू पराभव स्वीकारावा लागला . राज्यातील कांदा बाजारभाव , सोयाबीन बाजारभाव त्याचबरोबर राज्यातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मुद्द्यावर भारतीय जनता पार्टीला अपयश मिळाले असल्याचे मान्य करण्यात आली आहे .

यामुळे आता राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या निर्णयाला मुख्यमंत्र्याकडून हिरवा कंदील दाखवण्यात आला आहे . नुकतेच मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली आहे , या बैठकीमध्ये राज्यातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या निर्णयाला हिरवा कंदील देण्यात आला आहे . याशिवाय शाळांच्या अनुदानाचा टप्पा वाढीचा निर्णय देखील आगामी अधिवेशनामध्ये मार्गी लावण्याचे आश्वासन देण्यात आले आहे .

याशिवाय आश्रम शाळेच्या वेळामध्ये बदल करणे बाबत निर्णय घेण्यात येईल , तसेच माध्यमिक शिक्षक सुधारित वेतनश्रेणी लागू करणे संदर्भात लवकरच निर्णय घेण्यात येईल अशा प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय या बैठकीमध्ये घेण्यात आले आहे . सदरची बैठक नाशिक विभागाचे शिक्षक आमदार माननीय किशोर दराडे यांच्या पुढाकाराने मुंबई येथे सदरची बैठक आयोजित करण्यात आली होती .

जुनी पेन्शन लागू करण्याचे आश्वासन : या बैठकीमध्ये किशोर दराडे यांनी शिक्षक – कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांवर चर्चा केली , यावेळी शिक्षक आमदार किशोर दराडे सह मुख्याध्यापक संघ व टीडीएफ पदाधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती . यामध्ये चर्चा अंती सन 2005 पूर्वी नियुक्त झाले आहे , परंतु 2005 नंतर शंभर टक्के अनुदानित झालेल्या शिक्षक – कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात येईल असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे  .

याशिवाय सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना (जुनी पेन्शन योजना प्रमाणे ) लवकरच लागू करण्याचा निर्णय घेण्यात येईल , असे आश्वासन देण्यात आले आहे . याबाबत कमिटीची स्थापना करून शासन निर्णय लवकरच निर्गमित करण्यात येईल ,असे आश्वासित करण्यात आले आहे .याशिवाय 20 टक्के व 40 टक्के अनुदान घेणाऱ्या शाळा , महाविद्यालयासाठी टप्पा वाढ नैसर्गिक पद्धतीने नियमितपणे देण्याचे मान्य केले आहे .

या बैठकीमध्ये राज्यातील आदिवासी आश्रम शाळेतील शिक्षक कर्मचाऱ्यांचा पगार एक तारखेलाच निर्गमित करण्यात येईल , याशिवाय पुढील शैक्षणिक वर्षापासून शाळाच्या वेळा 11 ते 05 अशी करण्याची घोषणा देखील मुख्यमंत्र्यांनी या बैठकीदरम्यान करण्यात आली आहे .

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *