Spread the love

Live marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ state employee old pension scheme gr] : राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करणे संदर्भात ,  राज्य शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून दिनांक 27 मे 2024 रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे  .

केंद्र शासनाच्या अधिकारी / कर्मचारी यांची नियुक्ती ज्या पदावर अथवा रिक्त जागेवर करण्यात आलेली आहे व ज्यांची जाहिरात भरतीची / नियुक्तीची अधिसूचना नवीन निवृत्तीवेतन योजना लागू करण्याच्या अधिसूचनेच्या दिनांक पूर्वी म्हणजेच दिनांक 22 डिसेंबर 2003 पूर्वी निर्गमित झालेली आहे व जे दिनांक 1 जानेवारी 2004 रोजी अथवा त्यानंतर शासन सेवेत दाखल झाले आहेत , व ज्यांना नवीन परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना लागू झाली , त्या केंद्र शासनाच्या अधिकारी / कर्मचारी यांना केंद्रीय नागरी सेवा नियम 1972 / 2021 लागू करण्याचा एक वेळ पर्याय देणेबाबत केंद्र शासनाच्या निवृत्तीवेतन व निवृत्तीवेतनधारकांचे कल्याण विभागाचे दिनांक 02 मे 2024 रोजीच्या ज्ञापनानुसार निर्णय घेण्यात आलेला आहे .

सदरच्या शासन निर्णयानुसार उच्च व तंत्रशिक्षण विभागांतर्गत नमूद करण्यात आलेल्या , महाराष्ट्र शिक्षण सेवा अधिव्याख्याता , शासकीय अध्यापक महाविद्यालय गट-अ या संवर्गातील अधिकाऱ्यांना वित्त विभागाच्या दिनांक 2 फेब्रुवारी 2024 रोजीच्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार महाराष्ट्र नागरी सेवा नियम 1982 महाराष्ट्र नागरी सेवा नियम 1984 व महाराष्ट्र सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी नियम 1998 व अनुषंगिक नियमांच्या तरतुदी लागू करण्यात येत आहे .

यामध्ये अधिकारी कर्मचाऱ्यांचे नाव कारल्याचे नाव व अर्ज प्राप्त झालेल्या दिनांक बाबत विवरणपत्र खालील प्रमाणे आहे ..

वरील अधिव्याख्याता यांना जुनी निवृत्तीवेतन योजना व अनुषंगिक नियम लागू करण्याचा पर्याय विहित मुदतीमध्ये सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत . त्याचबरोबर वित्त विभाग शासन निर्णय दिनांक 2 फेब्रुवारी 2024 नुसार अधिव्याख्याता यांना जुनी निवृत्तीवेतन योजना व त्या अनुषंगिक नियम लागू करण्यात येत असल्यामुळे , त्यांचे नव्याने भविष्य निर्वाह निधी खाते तात्काळ उघडण्यात यावे . तसेच सदर अधिव्याख्यांचे राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली मध्ये खाते बंद करून त्यातील त्यांच्या हिश्याची रक्कम देय / अनुदेय व्याजासह संबंधितांच्या नव्याने उघडण्यात आलेल्या भविष्य निर्वाह निधी (GPF ) खात्यात जमा करण्याचे निर्देश देण्यात आले आहे .

या संदर्भातील उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून दिनांक 27 मे 2019 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन निर्णय डाऊनलोड करण्याकरिता खालील लिंक वर क्लिक करावेत .

शासन निर्णय (GR)

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *