Spread the love

Live marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ mahagai bhatta vadh Shasan Nirnay finance department ] : महाराष्ट्र राज्य शासन सेवेतील राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना  दिनांक 01 जानेवारी 2024 पासून 50 टक्के दराने महागाई भत्ता वाढ करणे संदर्भात अखेर राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून दिनांक 10 जुलै 2024 रोजी शासन निर्णय (GR) निर्गमित करण्यात आलेला आहे .

राज्य शासकीय व इतर पूर्णकालिक कर्मचारी यांना अनुज्ञेय भत्त्याच्या दरामध्ये सुधारणा करणे संदर्भात प्रस्ताव राज्य शासनाच्या विचाराधीन होता .  सदर शासन निर्णयानुसार राज्य शासनाकडून असे आदेश देण्यात येत आहे की , दिनांक 01 जानेवारी 2024 पासून सातव्या वेतन (7th pay commission ) आयोगातील सुधारित वेतन स्तरानुसार वेतन घेणाऱ्या अधिकारी /  कर्मचारी यांना महागाई भत्त्याचा दर 46 टक्के पासून 50% वाढ करण्यात येत आहे .

दिनांक 01 जानेवारी 2024 ते 30 जून 2024 या कालावधीतील महागाई महागाई भत्ता (DA ) फरकासह माहे जुलै महिन्यातील वेतन देयकासोबत वाढीव 50 टक्के दराने महागाई भत्ता अदा करण्याचे निर्देश देण्यात आले आहे .

महागाई भत्ता प्रदान करण्याच्या विद्यमान तरतुदी व कार्यपद्धती त्याचप्रमाणे यापुढे लागू असणार आहेत असे निर्देश देण्यात आले आहेत. सदरचा खर्च राज्य  शासकीय कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या वेतन व भत्ते या लेखा शीर्षाखाली खर्ची टाकण्याचे निर्देश सदर शासन निर्णयानुसार देण्यात आले आहेत.

या शासन निर्णयामुळे राज्यातील शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना माहे जुलै महिन्यापासून वाढीव महागाई भत्ता मिळणार आहे  , या संदर्भातील वित्त विभागाकडून दिनांक 10 जुलै 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे पाहू शकता..

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *