Spread the love

Live marathiprasar संगीता पवार प्रतिनिधी [ state employee Shasan Nirnay dated 04 October ] : राज्य शासकीय अधिकारी  / कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दिनांक 04 ऑक्टोबर 2024 रोजी राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .

सदर शासन निर्णय नुसार , केंद्र शासनाच्या अधिकारी / कर्मचारी यांना केंद्रीय नागरी सेवा निवृत्ती नियम 1972 व 2021 लागू करण्याचा एक वेळ पर्याय देणे संदर्भात , केंद्र शासनाच्या निवृत्तीवेतन त्याचबरोबर निवृत्तीवेतनधारकांच्या कल्याण विभागाच्या दिनांक 03 मार्च 2023 रोजी च्या कार्यालयीन ज्ञापणानुसार निर्णय घेण्यात आलेला आहे .

सदर निर्णयानुसार राज्य शासन सेवेतील जे अधिकारी / कर्मचारी दिनांक 01 नोव्हेंबर 2005 रोजी अथवा त्यानंतर राज्य शासन सेवेत नियुक्त करण्यात आलेले आहे . तथापि त्यांची पदभरती जाहिरात तसेच अधिसूचना दिनांक 01 नोव्हेंबर 2005 पूर्वी निर्गमित झालेली आहे . अशा राज्य शासकीय अधिकारी / कर्मचारी यांना जुनी पेन्शन योजना ( Old pension scheme) त्याचबरोबर भविष्य निर्वाह निधी  (GPF) नियम तसेच त्या अनुषांगिक बाबी लागू करण्याचा महत्त्वपूर्ण (IMP) निर्णय घेण्यात आलेला आहे .

सदर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून निर्गमित निर्णयानुसार सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत येणाऱ्या कार्यकारी अभियंता (स्थापत्य ) संवर्गात सद्यस्थितीत कार्यरत असणाऱ्या सदर निर्णयामध्ये नमूद करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांच्या शासन सेवेतील प्रथम नियुक्ती  ही महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परीक्षा 2004 नुसार म्हणजेच दिनांक 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी पदभरतीची जाहिरात / अधिसूचना निर्गमित केल्यानुसार  ,सदर अधिकाऱ्यांना जुनी पेन्शन योजना  (OPS ) व त्या अनुषंगिक बाबी लागू करण्यात येत आहेत .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *