Spread the love

Live marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ state employee appointment after retirement Shasan Nirnay ] :  सेवानिवृत्ती अधिकारी व कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतरही करार पद्धतीने किंवा पुनर्नियुक्ती / सेवेत मुदतवाढ देण्याची तरतुद आहे . या तरतुदीनुसार करार पद्धतीने सेवेत मुदवाढ देणेबाबत राज्य शासनांकडून सुधारित शासन निर्णय सामान्य प्रशासन विभागांकडून दि.08 जानेवारी 2016 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे .

महाराष्ट्र राज्य शासनांच्या दि.09 नोव्हेंबर 1995 रोजीच्या शासन निर्णयानुसार ( GR ) सेवानिृत्त झालेल्या अधिकारी / कर्मचाऱ्यांना पुनर्नियुक्ती , मुदवाढ आणि नियमित पदांवर करार पद्धतीने नियुक्ती तसेच कंत्राटी पद्धतीने करावयाच्या नियुक्ती संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या जनहीत याचिका क्र.85/2008 मध्ये दिलेल्या अटी शर्तींचे काटेकोर पालन करुन सुधारित नियमावली तयार करण्यात आलेली आहे .

सदर शासन निर्णयानुसार सेवानिवृत्तीनंतर सेवेत मुदतवाढ किंवा करार पद्धतीने सेवेत पुनर्नियुक्ती देण्यासाठी सेवानिृत्त अधिकारी / कर्मचारी यांचे विषय निहाय एमपॅनलमेंट तयार करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत .त्याचबरोबर करार / मुदतवाढ देताना नेमणुका प्रक्रिया अधिक पारदर्शक पद्धतीचा अवलंब करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत .सदरची नियुक्ती ही नियमित स्वरुपाच्या तत्वावर न करता विवक्षित कामासाठीच करण्यात यावी असे आदेशित करण्यात आलेले आहेत .

सदर करार पद्धतीने नेमणूक देण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना मासिक परिश्रमिक रक्कम ( वेतन ) ही 40,000/- रुपयांपेक्षा अधिक असू नये अशी मर्यादा टाकण्यात आलेली आहे .त्याचबरोबर पद्धतीने नेमणुका देत असताना कर्मचाऱ्यांचे कमाल वय हे 70 वर्षांपेक्षा अधिक असू नये ह्या अटींचे पालन करणे आवश्यक असणार आहे . तसेच सदर प्रकारच्या नियुक्तींमुळे नियमित कर्मचाऱ्यांच्या पदोन्नती किंवा इतर सेवा सातत्यावर कोणताही विपरीत परिणाम होणार नाही याची दक्षता घेण्याचे आदेशित करण्यात आलेले आहेत .

तर सदर प्रकारच्या नियुक्त अधिकारी / कर्मचाऱ्यांना आवश्यक प्रसंगी दौरा करावा लागल्यास , त्यांना त्यांच्या सेवानिवृत्तीच्या वेळेस वेतनमानास अनुसरुन प्रवासभत्ता तसेच दैनिक भत्ता अनुज्ञेय करण्यात येईल .सदरचा निर्णय हा शासकीय कार्यालय / संविधिक संस्था / शासकीय उपक्रम / सार्वजनिक उपक्रमे / महामंडळे आणि स्थानिक स्वराज्य संस्था यांना लागू असणार आहे .

सदर सेवानिवृत्त अधिकारी / कर्मचारी यांच्या सेवा करार पद्धतीने पुनर्नियुक्ती देणेबाबत सा.प्र.विभागांकडून निर्गमित करण्यात आलेला सुरधारित शासन निर्णय ( GR ) डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे .

शासन निर्णय

शासकीय कर्मचारी असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *