लाईव्ह मराठी पेपर , प्रणिता पवार : महराष्ट्र राज्यातील कर्मचाऱ्यांना दरवर्षी जुलै महिन्यांच्या 01 तारखेला मुळ वेतनाच्या 3 टक्के वेतनवाढ लागु करण्यात येत असते . सदर वेतनवाढ लागु करणेबाबत राज्य शासनांच्या वित्त विभागांकडून काही सुधारित नियमावली लागु करण्यात आलेल्या आहेत , सदर सुधारित नियमावली पुढील प्रमाणे पाहुयात ..
महाराष्ट्र नागरी सेवा ( वेतन ) नियम 1981 मधील नियम 39 ( 1 ) अपवाद ( 1 ) ए नुसार परिविक्षाधीन म्हणून एखाद्या पदावर थेट नियुक्ती केलेल्या कर्मचाऱ्यांची पहिली वेतनवाढ , त्याचा एक वर्षांचा परिविक्षेचा कालावधी पुर्ण झाल्यावर देण्यात यावी अशी तरतुद सुधारित नियमांवली मध्ये करण्यात आलेली आहे , तसेच अशा कर्मचाऱ्यांच्या बाबतीत नियुक्तीनंतर एक वर्षांच्या कालावधीऐवजी दिनांक 01 जुलै रोजी सहा महिने किंवा त्यापेक्षा जास्त सेवा पुर्ण झाल्यानंतर पहिली वेतनवाढ अनुज्ञेय करण्यात येईल असे नमुद करण्यात आलेले आहेत .
तसेच महाराष्ट्र नागरी सेवा ( वेतन ) नियम 1981 च्या नियम 39 व त्यामधील 1 अवदान 1 ए मधील याबाबतच्या विद्यमान तरतुदी सदर शासन निर्णयातील तरतुदीपुरत्या सुधारण्यात आल्या आहेत , असे मानण्यात यावेत असे सदर नियमात यथावकाश सुधारणा करण्यात येतील असे नमुद करण्यात आलेले आहेत .
सदर वार्षिक वेतनवाढ लागु करणेबाबत , सुधारित शासन निर्णय पुढीलप्रमाणे आहे ..
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !