Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ state employee yearly increament shasan paripatrak ] : राज्यातील कर्मचाऱ्यांना वार्षिक वेतनवाढी सादर करणेबाबत , राज्य शासनांच्या अधिक्षक ( प्राथमिक ) वेतन व भविष्‍य निर्वाह निधी पथक , पुणे यांच्या मार्फत दिनांक 02 जुलै 2024 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे .

राज्य कर्मचाऱ्यांना माहे जुलै 2024 च्या वेतनवाढी द्यावयाची आहेत , अशा कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीसाठी शाळेच्या Shalarth Login करुन पुढीलप्रमाणे कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत . यांमध्ये Worklist > Employee Information > Release Of Annual Increment यामधील दिसणाऱ्या सर्व कर्मचारी यांच्यापैकी ज्यांना माहे जुलै 2024 ची वेतनवाढ द्यावयाची आहे .त्या सर्व कर्मचाऱ्यांना Tik Mark करुन Add to List करुन Save करावेत .

त्यानंतर सदर वेतनवाढ दिलेल्या कर्मचारी यांची Printout सह सदरचा प्रस्ताव पुढे दिलेल्या वेळापत्रकानुसार अधिक्षक ( प्राथमिक ) , वेतन व भनिनि पथक पुणे या कार्यालयास समक्ष सादर करुन वेतनवाढ ॲप्रुव्ह करुन घेण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .

सदर वेतनवाढीचे प्रस्तावासोबत ऑनलाईन / ऑफलाईन वेतनवाढीचे चार्ट सादर करण्यात यावेत , तसेच वेतनवाढ प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक असणार आहेत . तसेच शाळेच्या लेटरपॅड व इतर कागद पत्रांवर शाळेचा शालार्थ आयडी चा  शिक्का न विसरता मारणे व मुख्याध्यापकांचा मोबाईल क्रमांक टाकण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .

तसेच ई-मेलवर वेतनवाढी बाबत कोणतीही माहिती स्विकारली जाणार नाही , तस शालार्थ ऑनलाईन वेतनवाढ प्रत सादर करणे बंधनकारक असणार आहे ,तसेच संच मान्यता 2022-23 ची प्रत सदर परिपत्रकांमध्ये नमुद वेळापत्रकानुसार सादर करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .

या संदर्भातील वेतन पथकांकडून निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन परिपत्रक पुढीलप्रमाणे पाहु शकता ..

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *