Spread the love

Live Marathipeper संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee / Worker Pay Leave Up To 5 Days ] : लोकसभा सार्वत्रिक निवडणुक 2024 करीता लोकसभा मतदारसंघातील मतदारांना मतदानाच्या दिवशी मतदान करण्यासाठी भरपगारी सुट्टी देणेबाबत , राज्य शासनांच्या उद्योग , ऊर्जा , कामगार व खनिजकर्म विभाागांकडून दिनांक 05 एप्रिल 2024 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .

राज्यातील 18 वर्षांवरील नोंदणी झालेल्या सर्व नागरिकांनी प्रत्येक निवडणूकीमध्ये मतदान करणे अपेक्षित आहे , तसेच सदरची बाब लक्षात घेता लोकप्रतिनिधीत्व कायदा 1951 च्या परिच्छेद 135 नुसार मतदानाच्या दिवशी सर्वसाधारणपणे मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क बजावता यावा याकरीता भरपगारी सुट्टी देण्यात येते अथवा काही ठिकाणी कामाच्या तासात योग्य ती सवलत देण्यात येते , मात्र मागील काही निवडणूक मध्ये असे दिसून आलेले आहेत कि , काही संस्था तसेच आस्थापना इ. त्याच्या कामगारांना भरपगारी सुट्टी अथवा सवलत देत नाहीत , यामुळे मतदारांना त्यांच्या मतदानाचा हक्क बजावण्यापासून वंचित रहावे लागते जे आपल्या लोकशाहीसाठी अत्यंत घात बाब असल्याचे नमुद करण्यात आलेले आहेत .

भारत निवडणूक आयोगाच्या दिनांक 16.03.2024 रोजी प्रसिद्ध झालेल्या प्रसिद्धपत्रकानुसार लोकसभा सार्वत्रिक निवडणूक – 2024 चा कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला आहे . सदर निवडणूकीचे मतदान दि.19 एप्रिल 2024 , दि.26 एप्रिल 2024 , दि.07 मे 2024 , दि.13 मे 2024 , दि.20 मे 2024 अशा पाच टप्यात होणार आहेत , तसेच महाराष्ट्र राज्याच्या सिमेलगत असणाऱ्या जिल्हामधील मतदारांना त्याना मतदानाचा हक्क योग्य रितीने बजावता यावा याकरीता त्यांना देखिल मतदानाच्या दिवशी सुट्टी देण्याचा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे .

राज्यातील जिल्हानिहाय मतदानाचे टप्पे , भरपगारी पगार मिळणारी दिनांक , याबाबत सविस्तर परिशिष्ट पुढीलप्रमाणे पाहू शकता ..

सीमालगतच्या मतदारांना त्यांच्या राज्यात मतदान करण्यासाठी देण्यात येणारी भरपगारी सुट्टी बाबत परिशिष्ट – 2 पुढीलप्रमाणे पाहु शकता ..

राज्यात तसेच राज्याच्या सीमेलगतच्या भागातील होणाऱ्या मतदान क्षेत्रात मतदार असणाऱ्या कामगार / अधिकारी / कर्मचारी यांना मत ते कामानिमित्त निवडणूक होणाऱ्या क्षेत्राबाहेर कार्यरत असले तरीही त्यांना निवडणूकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुट्टी देण्यात येईल ..तसेच सदरची सुट्टी उद्योग , उर्जा व कामगार विभाग अंतर्गत येणाऱ्या दुकाने व इतर आस्थापना , निवासी हॉटेल , खाद्यगृहे , अन्य नाट्यगृहे , व्यापार , औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना तसेच माहीती व तंत्रज्ञान कंपन्या शॉपिंग सेंटर , मॉल्स , रिटेलर्स इ.लागु असणार आहेत .

या संदर्भात राज्य शासनांच्या उद्योग , उर्जा , कामगार व खनिजकर्म विभागांकडून दिनांक 05 एप्रिल 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावेत .

शासन निर्णय (GR)

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *