Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ state employee washing & Dress allowance increase shasan nirnay ] : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या धुलाई व शिलाई भत्ता मध्ये वाढ करणेबाबत , राज्य शासनांच्या सामान्य प्रशासन विभागांकडून दि.10.10.2024 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
राज्य शासन सेवेतील वर्ग – 4 कर्मचाऱ्यांना पुरविण्यात येणाऱ्या गणवेशाच्या विविध दरांमध्ये वाढ करण्याची बाब राज्य शासनांच्या विचाराधीन होती , यानुसार सदर निर्णान्वये राज्यातील चतुर्थश्रेणी संवर्गातील कार्यरत कर्मचाऱ्यांना पुरविण्यात येणारे गणवेशाच्या विविध बाबींमध्ये म्हणजेच शिलाई दरांमध्ये सुधारणा करणे , महिला कर्मचाऱ्यांच्याा ब्लाऊजच्या शिलाई दरात वाढ करणे ..
तसेच गणवेश धुलाई भत्ता दरांमध्ये सुधारणा करणे तसेच गरम कपड्यांच्या गणवेशाच्या दरांमध्ये सुधारणा करण्यास सदर निर्णयानुसार शासन मान्यता देण्यात येत आहे . सुधारित दर पुढीलप्रमाणे पाहु शकता .
यांमध्ये शर्ट पँट शिलाई दर ( दोन वर्षातुन एकदा ) यांमध्ये 750/-रुपये प्रत्येक जोडीकरीता सुधारित दर निश्चित करण्यात आले आहेत , यापुर्वी हे दर 250/- रुपये असे होते . तर महिला कर्मचाऱ्यांसाठी दोन वर्षातुन एकदा करीता ब्लाऊजचा शिलाई दर हे 250/- रुपये ( प्रत्येक ब्लाऊज ) अशी सुधारणा करण्यात आली आहे . यापुर्वी हे दर 50/- रुपये असे होते .
तर लोकरीचा गणवेश शिलाई दरांमध्ये ( चार वर्षातुन एकदा ) 1500/- रुपये अशी सुधारणा करण्यात आली असून , यापुर्वी हे दर 350/- रुपये असे होते . तर धुलाई भत्ता दरमहा करीता 250/- रुपये अशी सुधारित दर निश्चित करण्यात आले आहेत . यापुर्वी हे दर 50/- दरमहा असे होते .
सदरचे सुधारित दर हे सदर शासन निर्णय निर्गमित झाल्याच्या दिनांकापासून लागु करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे .
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.