लाईव्ह मराठी पेपर , संगिता पवार : प्राथमिक शिक्षणावरील खर्चासाठी शिफारस केल्यानुसार बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांना सन 2018-19 ते सन 2022-23 मधील पहिल्या , दुसऱ्या व तिसऱ्या हप्त्यापोटी अनुोय वेतन अनुदान व मागील काही वर्षांसाठीचे थकीत वेतन अनुदान असे एकुण रुपये 197,62,15,749/- एवाढा निधी वितरीत करण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे .
आर्थिक वर्ष 2023-24 करीता बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या प्राथमिक शिक्षणावरील खर्च भागविण्याच्या प्रयोजनासाठी सहायक अनुदाने ( वेतन ) अंतर्गत रुपये 37,64,64,000/- इतकी तरतूद मंजूर आहे .यानुसार बृहन्मुंबई महानगरपालिकेस प्राथमिक शिक्षणावरील खर्चांसाठी रुपये 7,52,92,800/- इतके वेतन अनुदान म्हणून सर्वसाधारण शिक्षण , प्राथमिक शिक्षण , स्थानिक संस्थांना सहाय्य इतर स्थानिक संस्थांना अर्थसहाय्य , मुबई महानगरपालिकेस अनुदान , सहायक अनुदाने या लेखाशिर्षा अंतर्गत सन 2023-24 च्या मंजूर तरतुदीतून अदा करण्यास सदर शासन निर्णयानुसार मंजूरी देण्यात येत आहे .
सदर खर्चासाठी शिक्षण उपसंचालक मुंबई विभाग , मुंबई यांना आहरण व संवितरण अधिकारी त्याचबरोबर आयुक्त नियंत्रक अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहेत .सदरचा शासन निर्णय हा वित्त विभागाने त्यांच्या अनौपचारिक संदर्भ क्र.462 / व्यय -5 दि.23.05.2023 नुसार दिलेल्या सहमतीनुसार निर्गमित करण्यात येत आहेत .
हे पण वाचा : संवर्गबाह्य दुसऱ्या विभागात बदली करणेबाबत सुधारित GR निर्गमित !
बृहन्मुंबई महानगरपालिकेस प्राथमिक शिक्षणावरील खर्चासाठी वेतन अनुदानाची प्रतिपुर्ती करण्यास प्रशासकीय मान्यता देणेबाबतचा शालेय शिक्षण व क्रिडा विभागांकडून दि.01 जून 2023 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे .
आपण जर शासकीय , निमशासकीय कर्मचारी , इतर पात्र शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच पेन्शनधारक असाल तर खालील Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !