लाईव्ह मराठी पेपर , संगिता पवार : राज्य शासन सेवेत कार्यरत वर्ग 3 व 4 मधील कर्मचाऱ्यांना पदोन्नतीच्या संधी उपलब्ध नसल्याने असलेली कुंठितता घालविण्या संबंधी योजना बाबत वित्त विभागांकडून महत्वपुर्ण GR निर्गमित करण्यात आलेला असून या संदर्भातील अधिकृत सविस्तर GR पुढिल प्रमाणे पाहुयात ..
सा.प्र.विभागाच्या दि.08 जून 1995 नुसार गट क व ड मधील कर्मचाऱ्यांना पदोन्नतीच्या संधी उपलब्ध नसल्याने असलेली कुंठितता घालविण्या संबंधीची योजना दिनांक 01 ऑक्टोंबर 1994 पासून अंमलात आली आहे . या योजना अंतर्गत पदोन्नतीच्या पदाची वेतनश्रेणी अनुज्ञेय असून ज्या पदांना पदोन्नतीचे पद उपलब्ध नाही अशा पदधारकांना तसेच एकाकी पदावरील कर्मचाऱ्यांना वरीष्ठ वेतनश्रेणी अनुज्ञेय आहे .
सामान्य प्रशासन विभागाच्या दि.08.06.1995 च्या शासन निर्णयांमध्ये नमुद केल्याप्रमाणे ज्या कर्मचाऱ्यांना वरिष्ठ वेतनश्रेणी मंजूर करण्यात आली आहे त्यांना शासन निर्णय , वित्त विभाग दिनांक दि.03.08.2001 नुसार समकक्ष वेतनश्रेणी अनुज्ञेय असून ज्या कर्मचाऱ्यांना दिनांक 01 जानेवारी 1996 रोजी व त्यानंतर कालबद्ध पदोन्नतीचा लाभ अनुज्ञेय आहे त्यांना समकक्ष वेतनश्रेणी अनुज्ञेय असणार आहे .
दिनांक 01 जानेवारी 1996 रोजी वा त्यानंतर ज्या कर्मचाऱ्यांना कालबद्ध पदोन्नतीचा लाभ अनुज्ञेय ठरविण्यात आलेला आहे , अशा कर्मचाऱ्यांना त्यांनी धारण केलेल्या पदाची दिनांक 01 जानेवारी 1996 ची वेतनश्रेणी विचारात घेवून वरिष्ठ वेतनश्रेणी अनुज्ञेय होईल .
दिनांक 01 ऑगस्ट 2001 रोजी व त्यानंतर सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना अंतर्गत वरीष्ठ वेतनश्रेणीस पात्र होणाऱ्या कर्मचाऱ्यांना शासन निर्णय वित्त विभााग दिनांक 20 जुलै 2001 मधील आदेशानुसार वरिष्ठ वेतनश्रेणी अनुज्ञेय होणार आहे .GR पुढीलप्रमाणे आहे ..
आपण जर शासकीय -निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !