Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ state employee various demand stike ] : महाराष्ट्र राज्यातील महसुल विभागातील कर्मचाऱ्यांचे विविध मागण्यांसाठी दिनांक 10 जूलै 2024 पासुन बेमुदत संप आयोजित करण्यात आले आहेत , यामुळे महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनांच्या वतीने या संपामध्ये सहभागी घेण्याचे सर्व महसुल कर्मचाऱ्यांना सुचित करण्यात आले आहेत .

महसुल विभागातील कर्मचाऱ्यांचे विविध मागण्यांसाठी दि.10 जुलै 2024 पासुन बेमुदत संपावर जाणार आहेत , यांमध्ये जो पर्यंत शासनांकडून मागण्या पुर्ण करण्याचे आश्वासन दिले जाणार नाहीत , तो पर्यंत संप मागे घेतला जाणार नाही , असा इशारा देण्यात आला आहे . या संदर्भातील माहिती महाराष्ट्र राज्य महसुल कर्मचारी संघटनेचे जिल्हा चंद्रपुरचे उपाध्यक्ष श्री.अजय मेकलवार यांनी दिली आहे .

या संपाच्या वतीने महसूल कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या शासनांकडे सादर करण्यात येणार आहेत . यांमध्ये आकृतिबंधाची प्रमुख मागणी असणार आहे ,सध्या पुर्वीच्या जुन्या आकृतिबंधानुसार तब्बल 30 ते 35 टक्के पदे रिक्त आहेत , म्हणून एका अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांकडे एका पेक्षा अधिक पदाचा कार्यभार सोपविण्यात आलेला आहे , याबाबत राज्य शासनांकडून दांगट समितीचा अहवाल राज्य शासनांकडून स्विकारला आहे , परंतु त्यावर अहवालाची अंमलबावणी करण्यात आलेली नाही .

प्रमुख मागण्या : दांगट समितीच्या अहवालाची शिफारशी लागु करुन तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी , अव्वल कारकुन व मंडळ अधिकारी वर्गांमधून नायब तहसिलदार या पदावर पदोन्नती देण्यात यावी , महसूल विभागाचा आकृतिबंध तात्काळ लागु करण्यात यावा , नायब तहसीलदार या पदाची वेतनश्रेणी राजपत्रित अधिकारी प्रमाणे देण्यात यावी ..

तसेच कर्मचाऱ्यांचे पगार नियमित होण्यासाठी शासन निर्णय निर्गमित करण्यात यावा , तसेच अव्वल कारकून या पदावरील कर्मचाऱ्यांचे सुधारित वेतन निश्चित करण्यात यावेत . तसेच अव्वल कारकून ऐवजी महसूल सहाय्यक पद म्हणून मान्यता देण्यात यावी अशा प्रमुख मागण्यांसाठी महसूल विभागांकडून बेमुदत संपाचे आयोजन करण्यात आलेले आहेत .

संपामध्ये दिनांक 10 जुलै रोजी काळ्या फिती लावून काम सुरु असणार आहेत , तर दि.11 जुलै रोजी राज्यांमधील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शने करुन निषेध व्यक्त करण्यात येणार आहेत , तर दिनांक 12 जुलै रोजी लेखणीबंद करुन दिनांक 15 जुलै पासुन संपुर्ण राज्यांमध्ये राज्यव्यापी बेमुदत काम बंद आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आलेली आहे .

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *