Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ state employee various demand karyavahi ] : राज्यातील अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाची मा.मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 10 जुन 2024 रोजी बैठक आयोजित करण्यात आलेली होती . सदर बैठकीअंती विविध मागण्यांवर कार्यवाही करण्याचे निर्देश मा.मुख्य सचिव यांनी संबंधित विभागांना दिले आहेत .
सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना : अर्थसंल्पिय अधिवेशनात दिनांक 01 मार्च 2024 रोजी घोषित केल्याप्रमाणे सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजनेची अधिसूचना महासंघाने सुचविलेल्या बाबींचा समावेश करुन प्राधान्याने प्रसृत करण्याची मागणी केली असता ,मा.मुख्य सचिव यांनी सांगितले की याबाबत वित्त विभागांकडून कार्यवाही सुरु असल्याचे नमुद करण्यात आलेले आहेत .
तीन लाभाबाबत कार्यवाही : शासन शुद्धीपत्रक दिनांक 21 फेब्रुवारी 2024 मध्ये सुधारणा करुन , राज्य शासकीय अधिकाऱ्यांना तीन लाभांच्या 10 , 20, 30 ची सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेतील उच्च वेतनश्रेणी म्हणजे पीबी – 3 रुपये 5400/- ची मर्यादा काढुन , निवडसूची तयार करुन फक्त 25 टक्के पदांना न देता केंद्राप्रमाणे सरसकट सर्व कर्मचाऱ्यांना दुसरा व तिसरा पदोन्नतीच्या पदाचा लाभ घेण्याबाबत मागणी केलीर असता , याबाबत सविस्तर अहवाल तपासून कार्यवाही करण्यात येईल असे नमुद करण्यात आले आहेत .
तसेच सेवानिवृत्ती/ मृत्यु उपदानाची सध्याची रुपये 14 लाख ही कमाल मर्यादा केंद्र शासनाच्या धर्तीवर रुपये 20 लाख इतकी करणेबाबत वित्त विभागांकडून कार्यवाही सुरु असल्याचे नमुद करण्यात आले आहेत . तसेच निवृत्तीवेतन अंशराशीकरण पुनर्स्थापना कालावधी 15 वर्षाऐवजी 12 वर्षे बाबत केंद्र शासनाच्या धर्तीवर कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .
तसेच राज्य शासकीय कार्यरत व सेवानिवृत्त अधिकारी – कर्मचाऱ्यांना महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना अंतर्गत सुधारित कॅशलेश आरोग्य योजना लागु करणेबाबत सर्व अधिकारी / कर्मचारी यांचा सदर योजनेत समावेश असून योजनेच्या लाभसाठी आभा कार्ड उपलब्ध करुन देणेबाबत आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .
या संदर्भात राज्य शासनांच्या सामान्य प्रशासन विभागांकडून दिनांक 19 जुन 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर बैठकीचे इतिवृत्त पुढीलप्रमाणे पाहु शकता ..
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.