Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Maharashtra State Employee Mahagai Bhatta Vadh News ] : महाराष्ट्र राज्य शासन सेवेत कार्यरत सरकारी कर्मचारी तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारकांना केंद्र सरकारच्या धर्तीवर वाढीव 4 टक्के लाभ लागु करणे संदर्भात राज्य मंत्रीमंडळ बैठकीमध्ये अधिकृत्त निर्णय घेतला जाणार आहे .

मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 11 मार्च व 14 मार्च 2024 रोजी राज्य सरकारची कॅबिनेट मंत्रीमंडळाची बैठक आयोजित करण्यात आलेली आहे . सदर बैठकीमध्ये आचारसंहिता पुर्वीच राज्यातील विविध प्रलंबित प्रश्नांवर तोडगा तसेच विविध उपाय योजना , सुविधा बाबत अधिकृत निर्णय घेण्यात येणार आहेत . यांमध्ये राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या बाबत केंद्र सरकार प्रमाणे डी.ए लाभ लागु करण्यात येणार आहेत .

केंद्र सरकारच्या धर्तीवर वाढीव डी.ए लाभ : केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचारी तसेच पेन्शन धारकांच्या डी.ए मध्ये माहे जानेवारी 2024 पासून चार टक्के वाढ लागु करण्यात आल्याने , आता केंद्रीय कर्मचाऱ्यांना एकुण 50 टक्के दराने महागाई भत्ता प्राप्त होणार आहे . याच धर्तीवर महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांना महागाई भत्ताचा वाढीव लाभ अनुज्ञेय करण्यात येणार आहेत .

वित्त विभागांकडून प्रस्ताव तयार : राज्य शासनांच्या वित्त विभागांकडून प्रस्ताव तयार करण्यात आल्याची माहिती सुत्रानुसार समोर येत आहेत , तर सदरचा प्रस्ताव आज किंवा दि .14 मार्च रोजी होणाऱ्या कॅबिनेट मंत्रीमंडळ बैठकीमध्ये , सादर केला जाणार असून , याबाबत अधिकृत्त निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती समोर येत आहे .

माहे मार्च पेड इन एप्रिल वेतनासोबत वाढीव डी.ए लाभ : माहे मार्च पेड इन एप्रिल वेतना सोबत राज्यातील सरकारी कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना वाढीव चार टक्के महागाई भत्ताचा लाभ जानेवारी व फेब्रुवारी 2024 या दोन महिन्यांतील डी.ए फरकासह लाभ अनुज्ञेय होणार आहे . लोकसभेच्या आचार संहिता पुर्वीच केंद्र सरकारने घेतलेला निर्णय राज्य सरकारकडून राज्य कर्मचाऱ्यांकरीता घेण्यात येणार आहे .

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *