अखेर राज्य कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर , महागाई भत्ता वाढीवर अखेरचा शिक्कामोर्तब !

Spread the love

Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee Vadhiv Mahagai Bhatta News ] : राज्यातील कर्मचाऱ्यांच्या बाबतीत महागाई भत्ता वाढीवर राज्य शासनांकडून अखेर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे . केंद्र सरकारकडून मागील महिन्यांत केंद्रीय कर्मचाऱ्यांना वाढीव डी.ए बाबत अधिकृत्त कार्यालयीन ज्ञापन निर्गमित केल्यानुसार राज्य कर्मचाऱ्यांना लाभ अनुज्ञेय होणार आहे .

महागाई भत्ता 2 टक्के / 4 टक्के वाढ : प्रसार माध्यमातुन मिळालेल्या माहितीनुसार राज्यातील कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता मध्ये 2 टक्के वाढ तसेच काही प्रसार माध्यमातुन 4 टक्के डी.ए वाढणार अशी बातमी प्रसारित करण्यात येत होत्या . याबाबत अधिकृत माहिती घेतल्यानंतर मंत्रालयीन स्तरावर राज्यातील कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता मध्ये 2 टक्केच वाढ लागु करण्याचा प्रस्ताव होता .

परंतु आता राज्य शासनांकडून यावर पुर्नविचार करण्यात आला असून , केंद्र सरकारप्रमाणेच राज्यातील कर्मचाऱ्यांना 4 टक्के महागाई भत्ताचा लाभ अनुज्ञेय करण्यात येणार आहेत . कारण 2 टक्के महागाई भत्ता वाढ केल्यास , कर्मचारी संघटनांचा दबाव अधिक होईल , यामुळे राज्य शासनांकडून डी.ए मध्ये 2 टक्के ऐवजी 4 टक्केच वाढ लागु करण्यात येणार आहे .

सदर वाढीव महागाई भत्ता बाबतचा अधिकृत्त शासन निर्णय हा दिवाळी सणापुर्वीच निर्गमित होणे अपेक्षित होते , परंतु काही कारणास्तव सदर डी.ए वाढीचा निर्णय घेण्यात आला नाही . परंतु माहे नोव्हेंबर पेड इन डिसेंबर 2024 वेतनासोबत डी.ए फरकासह वाढीव 4 टक्के डी.ए देणेबाबत राज्य शासनांकडून अखेरचा शिक्कामोर्तब करण्यात आला आहे .

यामुळे आता राज्यातील शासकीय – निशासकीय कर्मचारी तसेच इतर पात्र असणारे अनुदानित शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना व पेन्शनधारकांना / कुटुंबनिवृत्तीवेतना धारकांना सदर वाढीव डी.ए चा लाभ अनुज्ञेय होणार आहे .माहे जुलै पासून 4 टक्के वाढ लागु केल्याने , राज्यातील कर्मचाऱ्यांना आता केंद्र सरकार प्रमाणे 46 टक्के दराने वाढीव डी.ए चा लाभ अनुज्ञेय होणार आहे .

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Comment