Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee Update About Election Duty ] : राज्यातील कर्मचारी मतदान प्रक्रिया कामकाजांमध्ये गुंतले होते , तर विदर्भामध्ये मतदान प्रक्रिया पुर्ण झालेल्या जिल्हांमध्ये कर्मचाऱ्यांना पोस्टल बॅलेट भेटलेच नाहीत . यामुळे कर्मचाऱ्यांच्या मतदानाचा नेमके काय ? असा प्रश्न कर्मचाऱ्यांकडून विचारले जात आहेत .
अमरावती लोकसभा मतदार संघामध्ये तब्बल 18 लाख मतदारांचे मतदान घेण्याकरीता राज्य शासन सेवेतील तब्बल 8992 कर्मचारी गुंतले होते , इतर जिल्ह्यातील , किंवा इतर मतदार संघातील कर्मचाऱ्यांना मतदान करण्याकरीता फॉर्म नं.12 व फॉर्म नं.12 अ अर्ज प्रशिक्षण दरम्यान भरले होते , परंतु 75 टक्के पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना पोस्टल बॅलेट / EDC प्रमाणपत्र मिळालेच नाहीत .
यांमध्ये मतदान केंद्राध्यक्ष , मतदान अधिकारी तसेच बीएलओचा समावेश आहे , तर वर्ग – 4 कर्मचारी यांना पोस्टल बॅलेट मिळालेच नसल्याने तब्बल 75 टक्के कर्मचारी हे आपल्या मतदान हक्कांपासून वंचित राहीले आहेत . यामुळे दुसऱ्यांचे मतदान घेणारे कर्मचारीच मतदानांपासून दुर झाले आहेत . त्यांना आता आपले हक्क कसे बजावतील , यावरुन कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड रोष कायम आहे .
यावरुन कर्मचाऱ्यांना एका प्रकारचे मतदानांपासून वंचित ठेवण्याचा सरकारचा डाव तर नाही ना ? असा सवाल कर्मचाऱ्यांकडून विचारला जात आहे . आता हे कर्मचारी आपला हक्क कसा काय बजावतील असा सवाल निवडणू अधिकाऱ्यांना विचारला जात आहे .
