राज्यातील या कर्मचाऱ्यांच्या प्रवास भत्यात वाढ करणेबाबत शासन निर्णय निर्गमित GR दि.24.06.2024

Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ state employee travelling allowance increase shasan nirnay ] : कायम प्रवास भत्यात प्रतिमहा रुपये 1500/- अशी सुधारणा करणेबाबत राज्‍य शासनांच्या विधी व न्याय विभागांकडून दिनांक 24 जुन 2024 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे .

राज्यातील लघुवाद , मुंबई व राज्यातील दुय्यम न्यायालयांतील बेलिफ कर्मचाऱ्यांच्या कायम प्रवास भत्यात प्रति महा रुपये 200/- रुपये ऐवजी 1500/- रुपये अशी सुधारणा विधी व न्याय विभागाच्या दिनांक 18.01.2021 रोजीच्या शासन निर्णयांमध्ये करण्यात आलेली आहे . त्याच धर्तीवर कौटुंबिक न्यायालयातील बेलिफ कर्मचाऱ्यांच्या कायमस्वरुपी प्रवास भत्यात रुपये 200/- रुपये ऐवजी 1500/- रुपये अशी सुधारणा करण्याबाबत …

शासनास विनंती करण्यात आली आहे . त्यानुसार कौटुंबिक न्यायालयातील बेलिफ कर्मचाऱ्यांना प्रति महा अनुज्ञेय असलेल्या रुपये 200/- रुपये इतक्या कायमस्वरुपी प्रवास भत्यात प्रवास भत्यात 1500/- अशी सुधारणा करणेबाबत , शासन निर्णय दिनांक 28.04.2023 रोजी काढण्यात आला होता , परंतु विधी व न्याय विभागाच्या दिनांक 28 एप्रिल 2023 रोजीच्या शासन निर्णयानुसार हा लघुवाद न्यायालय , मुंबई व राज्यातील दुय्यम न्यायालयातील बेलिफ कर्मचाऱ्यांना ज्याप्रमाणे दिनांक 01 सप्टेंबर 2021 पासून लागु करण्यात आहे .

त्याप्रमाणे कौटुंबिक न्यायालयांतील बेलिफ कर्मचाऱ्यांनाही दिनांक 01 सप्टेंबर 2021 पासून लागू करावा अशी विनंती शासनास करण्यात आली आहे . यानुसार राज्यातील कौटुंबिक न्यायालयांतील बेलिफ कर्मचाऱ्यांना प्रति महा रुपये 1500/- इतका कायमस्वरुपी प्रवास भत्ता दिनांक 01 मे 2023 पासून लागु करण्यास दिनांक 28 एप्रिल 2023 रोजीच्या शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आली होती .

तथाप‍ि सदरचा लाभ हा दिनांक 01 सप्टेंबर 2021 पासून पुर्वलक्षी प्रभावाने लागु करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहेत , व सदर कालावधीतील थकबाकी अनुज्ञेय असणार आहे . याबाबतचा दिनांक 24 जुन 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे पाहु शकता ..

Leave a Comment