Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee Transfer Update Shasan Paripatrak ] : कर्मचाऱ्यांच्या बदली संदर्भात राज्य शासनांच्या ग्राम विकास विभागांकडून दिनांक 31 मे 2024 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे .

रिट याचिका क्र.5258 / 2023  व अन्य याचिकांमध्ये मा.उच्च न्यायालय , नागपुर यांनी दिनांक 04 डिसेंबर 2023 रोजी पारित केलेल्या आदेशांमध्ये याचिका कर्त्या शिक्षकांना दुर्गम भागातुन सुगम भागात बदली मिळणेबाबत , सदर परिपत्रकांमध्ये माहिती देण्यात आलेली आहे .सदर परिपत्रकानुसार दिनांक 21.05.2024 व दिनांक 19.05.2024 रोजीच्या मे . बीन्सीस आय टी सर्विसेस प्रा.लि.पुणे यांना सादर करण्यात आलेल्या पत्राच्या संदर्भाधीन पत्रानुसार , उपस्थित करण्यात आलेल्या मुद्द्यांच्या अनुषंगाने नमुद करण्यात येते कि , यातील मुद्दा क्र.01 Server Availability व 02 Renewal of SMS and Email Work Order बाबत ( शिक्षक ऑनलाइ्रन बदली पार्टल सुरु करण्यासाठी लागणारे हार्डवेअर आणि त्याच्या साठी येणारा एकुण 01 वर्षासाठीचा खर्च ) ..

या अनुषंगाने विभागाच्या स्तरावर कार्यवाही करण्यात येत असून याबाबत सदर मे.बीन्सीस आयटी सर्विसेस प्रा.लि . पुणे यांना कळवियात येईल , असे नमुद करण्यात आलेले आहेत . तसेच दरम्यान शिक्षक ऑनलाईन बदल्यांसाठी सर्वर अनुषंगिक बाबींची पुर्तता पोर्टल उपलब्ध करुन देण्याचे सुचित करण्यात आलेले आहेत .

सदरची बाब ही तातडीची समजण्याची सुचित करण्यात आली आहे , तसेच मुद्दा क्र.03 व 04 बाबत जिल्हा परिषद अमारावती यांच्याकडून तातडीने माहिती उपलब्ध करुन घ्यावी , व जिल्हा परिषद , अमरावती यांना आवश्यक सूचना देण्यात येत आहेत . तसेच मुद्दा क्र.05 बाबत सध्या फक्त अमरावती जिल्हा परिषदेसाठी पोर्टल सुरु करण्याच्या सुचना शासनांच्या समक्रमांकीत दिनांक 15.05.2024 रोजीच्या पत्रानुसार देण्यात आलेल्या आहेत , त्यानुसार कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .

या संदर्भात ग्राम विकास विभागांकडून दिनांक 31 मे 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन परिपत्रक पुढीलप्रमाणे पाहु शकता ..

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *