कर्मचारी बदली 2024 बाबत ग्राम विकास विभागांकडून दिनांक 17 मे 2024 रोजी निर्गमित झाला अत्यंत महत्वपुर्ण परिपत्रक !

Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee Transfer Update News ] : राज्य कर्मचाऱ्यांच्या बदली प्रक्रिया 2024 संदर्भात राज्य शासनांच्या ग्रामविकास विभागांकडून दिनांक 17 मे 2024 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे .

सदरचे परिपत्रक हे कक्ष अधिकारी ( ग्रामविकास विभाग ) मार्फत राज्यातील सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी ( जिल्हा परिषदा सर्व ) यांच्या प्रति सादर करण्यात आलेले आहेत . सदर परिपत्रकांमध्ये नमुद करण्यात आलेले आहेत कि , शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी परीक्षेच्या आधारे जिल्हा परिषद अंतर्गत करावयाच्या भरतीपुर्वी बदली प्रक्रिया राबविण्याबाबत आदेशित करण्यात आलेले आहेत .

शालेय शिक्षण विभागाच्या दिनांक 21 जून 2023 रोजीच्या शासन निर्णयानुसार त्याचबरोबर शासनांचे समक्रमांकित दिनांक 11.03.2024 रोजीचे पत्र त्याचबरोबर आयुक्त – शिक्षण , महाराष्ट्र राज्य पुणे यांचे दिनांक 19.04.2024 रोजीचे पत्रांच्या आधारे तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश सदर परिपत्रकानुसार देण्यात आलेले आहेत .

सदर प्रकरणी संदर्भातील करण्यात आलेले शासन निर्णयांमध्ये शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी परीक्षेच्या आधारावर जिल्हा परिषदा अंतर्गत करावयाच्या पदभरती संदर्भात रिक्त पदे निश्चित करण्याबाबत व नियुक्त शिक्षकांच्या बदली बाबत सुधारित अटी लागु करण्यात आलेले आहेत .

दिनांक 06 मार्च 2024 रोजी बदली प्रक्रिया राबविणेबाबतचा उप सचिव , महाराष्ट्र राज्य यांचे पत्र .

सदर परिपत्रकांमध्ये संदर्भाधिन नमुद दिनांक 21 जून 2023 रोजीचा सविस्तर शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करोवत .. शासन निर्णय (GR)

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Comment