Spread the love

Live Marathipepar प्रणिता पवार प्रतिनिधी [ state employee transfer to other department Shasan nirnay ] : राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या विनंती नुसार , मुळ आस्थापनेवरुन राज्य शासनांच्या दुसऱ्या नियुक्ती प्राधिकाऱ्याच्या आस्थापनेवर कायमस्वरुपी पद्धतीने समोवशनाचे धोरणबाबत दि.15 मे 2019 रोजीच्या निर्णयानुसार नमुद करण्यात आले आहेत .

नियुक्ती प्राधिकाराच्या आस्थापनेवर कायमस्वरुपी पद्धतीने समावेशन केवळ गट क संवर्गातीलच कर्मचाऱ्यांनाच लागु आहेत , सदर धोरण हे गट अ , ब आणि ड संवर्गाकरीता लागु नाहीत . याकरीता प्रथम सदर कर्मचाऱ्यांस सदर मुळ प्राधिकाराऱ्याच्या संवर्गांमध्ये किमान 05 वर्षांची सेवा पुर्ण करणे आवश्यक असतील . तसेच सदर मुळ संवर्गात सदर कर्मचाऱ्यांना सेवा प्रवेश नियमात नमुद करण्यात आलेले सर्व अर्हता / परीक्षा इ. बाबींची पुर्तता करणे आवश्यक असतील .

  • तसेच सदर कर्मचाऱ्यास स्थायित्व लाभाचे प्रमाणपत्र मिळालेले असणे आवश्यक असतील , तर सदर संवर्गातील सदर कर्मचाऱ्याची कामगिरी किमान ब दर्जाची असणे आवश्यक असेल . तर कार्यमुल्यमापन ( प्रतिवर्षाकरीता ) संख्यात्मक गुणांकन किमान 04 इतके असणे आवश्यक असतील .
  • सदर कर्मचाऱ्याच्या विरोधात सध्यस्थितीत कोणत्याही प्रकारची न्यायालयीन / विभागीय चौकशी सुरु अथवा प्रस्तावित नसावे .

संवर्ग अंतर्गत कायमस्वरुपी बदली नियम : सदर बदली ही केवळ क संवर्गातील समान पदनाम , समान सेवाप्रवेश नियमातील तरतुदी तसेच समान वेतनश्रेणी तसेच समान कर्तव्ये व जबाबदाऱ्या असणाऱ्या पदांकरीता कायमस्वरुपी समावेशन करण्यात येते . जसे कि , तलाठी पदावरुन तलाठी पदावर , लिपिक पदावरुन लिपिक , प्रयोगशाळा सहाय्यक पदावरुन प्रयोगशाळा सहाय्यक पदावर अशा स्वरुपात संवर्ग अंतर्गत बदली करता येते .

MPSC कक्षेतील गट क संवर्गातील पदांना अशा स्वरुपाची संवर्ग अंतर्गत बदली करता येत नाही , तसेच एकाच जिल्ह्यात एका नियुक्ती प्राधिकाऱ्याकडून दुसऱ्या प्राधिकाऱ्याकडे बदली करता येत नाही , जिल्हा बदल बदल असणे आवश्यक असेल . तर सरकारी कार्यालयातुन महामंडळे ,जिल्हा परिषदा , नगरपालिका , महानगरपालिका इ. आस्थापनेवर बदली करता येणार नाही .सदर प्रकारचे समावेशन हे सबंधित कर्मचाऱ्यांचा हक्क नसेल .

दुसऱ्या प्राधिकाऱ्याच्या ठिकाणी बदली झाल्याच्या नंतर त्यास सेवा ज्येष्ठताचे कोणतेही लाभ मिळणार नाहीत . अशा प्रकारची बदली कर्मचाऱ्यास त्याच्या सेवा कालावधीत केवळ एकदाच करता येईल .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *