कर्मचाऱ्यांच्या बदलीचे सुधारित वेळापत्रक जाणून घ्या सविस्तर ; निवडणूकीनंतर आता बदल्यास येणार वेग !

Spread the love

Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ state employee Transfer sudharit timetable ] : राज्यातील जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांचे वेळापत्रक बाबत राज्य शासनांच्या ग्राम विकास विभाग मार्फत राज्यातील सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी ( जिल्हा परिषदा सर्व ) यांच्याप्रती महत्वपुर्ण परिपत्रक सादर करण्यात आलेले आहेत .

सदरच्या सुधारित वेळापत्रकानुसार आवश्यक शिक्षकांच्या याद्या प्रसिद्ध करणे व त्या अनुषंगाने प्राप्त आक्षेप यावर निर्णय घेण्यासाठी दिनांक 01 जानेवारी ते दि.28 फेब्रुवारी पर्यंत कालावधी नमुद आहे . तसेच समानीकरण अंतर्गत रिक्त पदे तसेच बदलीसाठी उपलब्ध करयात आलेल्या रिक्त पदे याबाबतची माहिती जिल्हा परिषदेने निश्चित करण्याचा कालावधी हा 01 मार्च ते 31 मार्च असा असणार आहे .

तसेच बदलीकरीता आवश्यक सर्व डाटा जिल्हा परिषदेने तयार करुन तो डाटा विन्सीस कंपनीस उपलब्ध करुन देण्यासाठी दिनांक 01 एप्रिल ते 20 एप्रिल असा कालावधी नमुद आहे . तसेच बदलीचा टप्पा क्रमांक 01 हा दि.21 एप्रिल ते 27 एप्रिल दरम्यान असणार आहे , तसेच बदलीचा टप्पा क्रमांक 02 हा दि.28 एप्रिल ते 03 मे दरम्यान निश्चित करण्यात आलेला आहे .

तसेच टप्पा क्र.03 हा दिनांक 04 मे ते 09 मे दरम्यान असणार आहे . याशिवाय टप्पा क्र.04 हा 10 मे ते 15 मे दरम्यान ठरविण्यात आलेला आहे . याशिवाय अवघड क्षेत्रातील रिक्त्‍ जागा भरणे याबाबत दिनांक 28 मे ते 31 मे दरम्यान वेळापत्रक निश्चित करण्यात आलेला आहे . याबाबतचा सविस्तर परिपत्रक डाऊनलोड करण्यासाठी लिंकवर क्लिक करावेत ..

शासन परिपत्रक (PDF)

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Comment