Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee Transfer Shasan Paripatrak ] : कर्मचाऱ्यांच्या बदली संदर्भात शालेय शिक्षण व क्रिडा विभागांकडून दिनांक 06 मार्च 2024 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे , या संदर्भातील सविस्तर परिपत्रक पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात ..
राज्य शासनांच्या शासन निर्णय दिनांक 21 जून 2023 नुसार जिल्हा अंतर्गत बदली करीता जे शिक्षक पुर्वी पासून कार्यरत आहेत , त्यांच्या पेकी बदली इच्छुक शिक्षकांना त्यांच्या विकल्पानुसार एक संधी देवून जागा रिक्त असल्यास , समुपदेशाद्वारे रिक्त पदी नियुक्ती देण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत , अशी तरतुद सदर निर्णयांमध्ये करण्यात आलेली आहे .
नविन शिक्षक भरती सुरु झाली असून जे शिक्षक जिल्हा अंतर्गत बदली करीता इच्छुक आहेत , त्यांच्या साठी राज्यातील सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना समुपदेशाद्वारे बदली प्रक्रिया राबविण्यास आदेशित करण्याची मागणी निवेदनानसुार करण्यात आलेली आहे . त्या अनुषंगाने नमुद करण्यात येते कि , शासन निर्णय दिनांक 21 जुन 2023 मधील अ.क्र 02 नुसार कार्यवाही होत नसल्या बाबत सदर विभागास अनेक लेखी व मौखिक तक्रारी प्राप्त होत असल्याने , जिल्हा परिषदे अंतर्गत नियुक्त शिक्षकांच्या बदली बाबतच्या सुधारित अटी ग्राम विकास विभागाच्या सहमतीने दिनांक 21 जुन 2023 च्या शासन निर्णयानुसार विहीत करण्यात आलेल्या आहेत .
सदर शासन निर्णयांमधील नमुद अ.क्र.02 नुसार आवश्यक ती कार्यवाही करणेबाबत सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांना आपल्या स्तरावरुन निर्देश देण्याची विनंती राज्याचे उप सचिव तुषार महाजन यांच्याकडून राज्याचे ग्रामविकास विभागाचे उप सचिव यांच्या प्रति पत्र सादर करण्यात आलेले आहेत . या संदर्भात राज्य शासनांच्या शालेय शिक्षण व क्रिडा विभागांकडून दिनांक 06 मार्च 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर परिपत्रक पुढीलप्रमाणे पाहु शकता ..
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.