लाईव्ह मराठी पेपर , संगिता पवार : महाराष्ट्र राज्य शासन सेवेतील कर्मचाऱ्यांच्या सन 2023-24 चालु आर्थिक वर्षातील सर्वसाधारण बदल्या संदर्भात आत्ताची सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे , या संदर्भात राज्य शासनांच्या सामान्य प्रशासन विभागांकडून दि.30 मे 2023 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
मागील वर्षी राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांच्या सर्वसाधारण बदल्या झाल्या नाहीत , यामुळे राज्यातील बऱ्याच कर्मचाऱ्यांना बदल्यापासुन वंचित रहावे लागले होते . गेल्या वर्षी सर्वसाधारण बदल्यास राज्य शासनांकडून वारंवार मुदतवाढ देण्यात येत होती .अखेर सन 2022-23 मधील सर्वसाधारण बदल्या रद्दच करण्यात आलेल्या होत्या . या वर्षी देखील सन 2023-24 मधील चालु आर्थिक वर्षातील सर्वसाधारण बदल्या करण्यास मुदतवाढ देण्यात आलेली आहे .
महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम 2005 मधील तरतुदीनुसार राज्य शासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या प्रत्येक वर्षी एप्रिल ते मे महिन्यात सर्वसाधारण बदल्या करण्यात येत असतात , परंतु काही प्रशासकीय कारणास्तव , सन 2023-24 या चालु आर्थिक वर्षातील दि.31 मे 2023 पर्यंत करावयाच्या सर्वसाधारण बदल्या ह्या दि.30 जुन 2023 पर्यंत मुदवाढ देण्यात येत आहेत .
हे पण वाचा : जून महिन्याच्या वेतन / पेन्शन सोबत मिळणार मोठे आर्थिक व सेवाविषयक लाभ !
सध्या राज्य शासनांकडून संवर्ग ब मधील अधिकाऱ्यांच्या नियतकालिक बदल्या करण्यात येत आहेत ,या करीता शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसाठी वेळ लागत असल्याने , बदली प्रक्रियेस मुदतवाढ देण्यात येत आहे . सदर बदलीस मुदवाढ देण्यासंदर्भात सा.प्र.विभागाकडून दि.30.05.2023 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे पाहू शकता ..
आपण जर शासकीय , निमशासकीय , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी व इतर पात्र कर्मचारी त्याचबरोबर पेन्शनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !