Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ state employee transfer paripatrak from chief election officer Maharashtra ] : विधानसभा निवडणूक 2024 च्या अनुषंगाने राज्यातील अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या बदली / पदस्थापनेबाबत , मा.मुख्य निवडणुक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित करण्यात आलेले आहेत .

मुख्य निवडणुक अधिकारी महाराष्ट्र यांच्या वतीने दिनांक 05 ऑगस्ट 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेल्या परिपत्रकानुसार राज्यातील सर्व अपर मुख्य सचिव / प्रधान सचिव / सचिव सर्व मंत्रालयीन विभाग तसेच पोलिस महासंचालक महाराष्ट्र राज्य यांच्या प्रति , भारत निवडणूक आयोगाच्या दिनांक 31 जुलै 2024 रोजीच्या पत्रानुसार विधानसभा सार्वत्रिक निवडणुक 2024 च्या अनुषंगाने अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या बदली / पदस्थापनेबाबत , परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहेत .

सदरच्या परिपत्रकानुसार नमुद करण्यात आलेले आहेत कि , मा. भारत निवडणुक 2024 च्या अनुषंगाने अधिकाऱ्यांच्या बदली / पदस्थापनेबाबत , सविस्तर सुचना दिलेल्या आहेत . सदर पत्रानुसार मा.भारत निवडणुक आयोगाने पत्रातील बदल्या / पदस्थापना संबंधीच्या सुचना लागु होतील वा होणार नाहीत , अशा अधिकाऱ्यांची पदनामे निश्चित केली आहेत .

सदर विभाग अंतर्गत निवडणुकीशी संबंधित असलेल्या अशा सर्व अधिकाऱ्यांच्या बदल्या / पदस्थापना करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडून तपशिल उपलब्ध करुन घेण्यात यावा असे नमुद करण्यात आलेले आहेत . तसेच मा.भारत निवडणुक आयोगाच्या दिनांक 31 जुलै 2024 रोजीच्या पत्रांमध्ये नमुद केलेल्या सर्व बाबींची बदल्या / पदस्थापना करतांना विशेष दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .

हे पण वाचा :योजनादुत : मुख्यमंत्री योजनादुत कार्यक्रम अंतर्गत राज्यातील तब्बल 50,000 युवकांना रोजगार , जाणून घ्या पात्रता , अर्ज प्रक्रिया !

तसेच मा.भारत निवडणुक आयोगाला या संदर्भात दिनांक 20 ऑगस्ट 2024 पर्यंत अहवाल सादर करावयाचा असल्याने ,  या सर्व बदल्या / पदस्थापनेबाबतची कार्यवाही दिनांक 16 ऑगस्ट 2024 पुर्वी करण्यात येवून सदरचा अहवाल दिनांक 19 ऑगस्ट 2024 पर्यंत मा. मुख्य सचिव , महाराष्ट्र यांच्या कार्यालयास सादर करण्याचे निर्देश आहेत .

तसेच मतदार यादीचा विशेष संक्षिप्त कार्यक्रम दिनांक 06 ऑगस्ट 2024 ते दिनांक 30 ऑगस्ट 2024 या कालावधीत पार पडणार असल्याने मतदार नोंदणी अधिकारी , सहायक मतदार नोंदणी अधिकारी व सदर पुनरिक्षण कार्यक्रमाशी संबंधित अधिकारी / कर्मचारी यांच्या बदल्या करताना मा. भारत निवडणुक आयोगाच्या दिनांक 31 जुलै 2024 रोजीच्या पत्रांमध्ये नमुद केलेल्या परि.07 चे काटेकोरपणे पालन व्हावे , असे नमुद करण्यात आलेले आहेत .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *