लाईव्ह मराठी पेपर , संगिता पवार : राज्यातील शिक्षक तसेच कर्मचारी यांच्या बदली संदर्भात महाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षण व क्रिडा विभागांकडून दिनांक 21 जून 2023 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . सुधारित बदली (Transfer ) GR पुढीलप्रमाणे पाहुयात ..
ग्रामविकास विभाग अंतर्गत ZP शाळांमधील शिक्षक – कर्मचाऱ्यांची आंतरजिल्हा बदली 2022 ची प्रक्रिया पूर्ण झाली आहे , तसेच सदर बदल्यंमध्ये विनंती केलेल्या ज्या शिक्षकांना बदली मिळालेली नाही , अशा शिक्षकांचे विनंती अर्ज प्रतिक्षाधिन ठेवून जशी पदे रिक्त होतील त्याप्रमाणे रिक्त पदी बदली देण्याबाबतची कार्यवाही ग्रामविकास विभागाने करावी असे आदेश देण्यात आले आहेत .आंतरजिल्हा बदली संपुर्णत : बदं करण्याची तरतुद ग्रामविकास विभागाने त्यांच्या बदली धोरणांमध्ये करावी तसेच अवघड क्षेत्राच्या निकषांचे पुनर्विलोकन करुन सुधारित निकषांचा समावेश बदली धोरणांमध्ये करावे असे आदेश देण्यात आलेले आहेत .
जिल्हा अंतर्गत बदलीसाठी जे शिक्षक पुर्वीपासून कार्यरत आहेत , त्यांच्या पैकी बदली इच्छुक शिक्षकांना त्यांच्या विकल्पानुसार एक संधी देवून जागा रिक्त असल्यास समुपदेशनाद्वारे रिक्त पदी नियुक्ती देण्यात यावी , समुपदेशनापुर्वी संभाव्य भरण्यात येणारी नविन पदे विचारात घ्यावी व शाळास्तरावर समान शिक्षक राहतील याची दक्षता घेण्याची सुचना करण्यात आलेली आहे .
हे पण वाचा : NPS धारक राज्य कर्मचाऱ्यांना अर्जित रजा रोखीकरणाचा लाभ लागू ..
बदलीची कार्यवाही पुर्ण झाल्यानंतर आधार प्रमाणित संचमान्यतेनुसार रिक्त असणाऱ्या पदांची मागणी पवित्र झाल्यानंतर आधार प्रमाणित संचमान्यतेनुसार रिक्त असणाऱ्या पदांची 80 टक्के पदे बिंदुनामावलीप्रमाणे भरण्याकरीता पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक उपलब्ध करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत . त्याचबरोबर नव्याने नियुक्ती झाल्यानंतर सदर शिक्षकांस जिल्हा बदलीचे हक्क राहणार नाहीत .
जिल्हा अंतर्गत आपसी बदली , वैद्यकीय कारणास्तव तसेच तक्रारीच्या अनुषंगाने वा पती – पत्नी एकत्रिकरणांतर्गत इ.अपवादात्मक प्रकरणी करावयाच्या बदली संदर्भात ग्रामविकास विभागांकडून धोरण ठरविण्यात येणार आहेत .
सदर बदली बाबत सुधारित अटी लागु करणे बाबत शालेय शिक्षण व क्रिडा विभागांकडून दि.21.06.2023 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे ..
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक तसेच कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !